Home /News /entertainment /

Lata Mangeshkar Health Update: आशा भोसलेंनी दिली लतादीदींची हेल्थ अपडेट

Lata Mangeshkar Health Update: आशा भोसलेंनी दिली लतादीदींची हेल्थ अपडेट

प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना कोरोना (Covid 19) आणि न्युमोनियाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मुंबई, 14 जानेवारी-   प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर  (Lata Mangeshkar)   सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना कोरोना   (Covid 19)  आणि न्युमोनियाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या सध्या ICU मध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीची चिंता सर्वांनाच लागून आहे, दरम्यान दीदींच्या लहान बहीण आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले   (Asha Bhosle)  यांनी कोरोना नियमांमुळे दीदीला प्रत्यक्षपणे बघू न शकण्याची खंत व्यक्त केली आहे. इ टाइम्सच्या रिपोर्टनुसार, त्यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी बहीण आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्या म्हणाल्या, 'मीसुद्धा प्रत्यक्षपणे रुग्नालयात जाऊ शकत नाही. त्यामुळे मलासुद्धा रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या हेल्थ अपडेट्समधूनच माहिती मिळत आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील डॉक्टरांनी दीदींना प्रत्यक्षपणे भेटण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मीसुद्धा दीदीजवळ जाऊ शकत नाही.सध्या देशात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करत शासनाने अनेक नियम आणि अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे आपल्या हालचालींवर काहीसे निर्बंध आले आहेत'. आशाताई पुढं म्हणाल्या, 'सध्या हवामानात फारच बदल होत आहे. सातत्याने होत असलेल्या या बदलांमुळे, मलासुद्धा खोकला, सर्दी झाली आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त बाहेर जाणं टाळते. परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे आधीच्या तुलनेत लता दीदींच्या प्रकृतीत सुधार झाला आहे'. देशातील प्रत्येक लोक दीदींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हाव्ही. आणि त्या लवकर घरी परत याव्या यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या लता मंगेशकर 92 वर्षांच्या आहेत. त्यामुळे सध्याचं वातावरण आणि त्यांचं वय पाहता खबरदारी म्हणून त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे. (हे वाचा:डॉ. प्रतीत समदानी यांनी लता मंगेशकर यांच्या हेल्थबाबतीत दिली मोठी अपडेट) मीडिया रिपोर्टनुसार, लता मंगेशकर यांना आपल्या एका कर्मचाऱ्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आधी कोरोनाची लागण झाली होती. तो लता मंगेशकर यांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Coronavirus, Entertainment

    पुढील बातम्या