VIDEO: पुन्हा दिसणार खाकीचा रुबाब; 'नवे लक्ष' लवकरच आपल्या भेटीला

'लक्ष' मालिकेनंतर' आत्ता 'नवे लक्ष' देणार थरारक अनुभव.

'लक्ष' मालिकेनंतर' आत्ता 'नवे लक्ष' देणार थरारक अनुभव.

 • Share this:
  मुंबई, 19 जून- छोट्या पडद्यावर काही मालिकांनी निरोप घेतला आहे. तर काही नव्या मालिका येण्याच्या तयारीत आहेत. सध्या मराठी मालिका(Marathi Serial) चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहेत. स्टार प्रवाहवर ‘नवे लक्ष’(Nave Lakshya) ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. पोलिसांच्या धाडसाचं कौतुक करणारी आणि गुन्हेगारांना जेरबंद करणारी ही मालिका आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  स्टार प्रवाहवर ‘लक्ष’ ही मालिका प्रसारित होतं होती. पोलीस केंद्रित असलेली ही मालिका प्रेक्षकांना बरीच पसंत पडली होती. आता याचं पार्श्वभूमीवर आधारित ‘नवे लक्ष’ ही मालिका प्रसारित होणार आहे. पोलीस हा समाजातील एक महत्वाचा घटक आहे. त्यांच्यामुळे समाजातील लोक सुरक्षितपणे वावरू शकतात. याच पोलिसांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे. ही मालिका 4 जुलैपासून स्टार प्रवाहवर दर रविवारी रात्री 9 वाजता पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पोलीस आणि गुन्हेगारांचा तो थरार अनुभवता येणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. (हे वाचा:VIDEO: शंतनू-शर्वरी बांधणार जन्मगाठ; पाहा 'शुभमंगल ऑनलाईन' मध्ये लगीनघाई  ) ‘होम मिनिस्टर’ मधील लाडके भावोजी अर्थातच आदेश बांदेकर हे ‘नवे लक्ष्य’ या मालिकेचे निर्माता आहेत. त्यांनी निर्मिती क्षेत्रातही आपली खास ओळख निर्माण केली आहे. महत्वाचं म्हणजे या मालिकेतून ते आपला मुलगा सोहम बांदेकर याला लॉन्च करत आहेत. ही माहिती यापूर्वीसुद्धा देण्यात आली होती. आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी मनोरंजन क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. सुचित्रा यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे. आत्ता हाचं वारसा पुढे न्हेत सोहमसुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: