मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संजीवनी रणजीतच्या हातात घालणार बेड्या; 'राजा राणी..' मध्ये येणार मोठा ट्वीस्ट

संजीवनी रणजीतच्या हातात घालणार बेड्या; 'राजा राणी..' मध्ये येणार मोठा ट्वीस्ट

कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या ‘राजा राणीची ग जोडी’ मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या ‘राजा राणीची ग जोडी’ मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या ‘राजा राणीची ग जोडी’ मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 15 जुलै- ‘राजा राणीची ग जोडी’ (Raja Ranichi G Jodi) मालिकेमध्ये लवकरच एक नवा ट्वीस्ट येणार आहे. लवकरच प्रक्षेपित एपिसोडमध्ये संजीवनी (Sanjivani) पती रणजीत (Ranjit) ढाले पाटीलला अटक करताना दिसणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. येणाऱ्या काही एपिसोडमध्ये हाय होलटेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये संजू PSI झाल्यापासून नवनवीन संकटे तिच्यासमोर उभी राहताना दिसत आहेत.
कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या ‘राजा राणीची ग जोडी’ मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये समजूतदार रणजीत आणि थोडीशी खट्याळ नटखट संजूची जोडी सर्वांनाचं भुरळ पाडते. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खुपचं आवडते. मालिकेत रणजीतच्या साथीने अनेक संकटांवर मात देत संजीवनी PSI बनली आहे. मात्र psi बनल्यानंतर कुटुंब आणि आपलं कर्तव्य या चक्रव्ह्यूवमध्ये ती सतत अडकत आहे. (हे वाचा: भारती सिंगने घरी ठेवला नाही वडिलांचा एकही फोटो; कारण ऐकून बसेल धक्का ) नुकताच ‘राजा राणीची ग जोडी’ मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये खुपचं इमोशनल ड्रामा पाहायला मिळणार आहे. येत्या काही भागांमध्ये संजीवनीवर मोठं धर्मसंकट आलेलं पाहायला मिळणार आहे. मालिकेत संजूला आपला पती रणजीत ढाले पाटीलला अटक करावी लागणार आहे. त्यामुळे ती चांगल्याच संकटात सापडली आहे. एकीकडे संजूचं कर्तव्य आणि दुसरीकडे नेहमी तिची ढाल बनणारा तिचा नवरा. मात्र रणजीतसुद्धा आपल्या विचारांवर ठाम आहे. त्यानेसुद्धा संजूला आपलं कर्तव्य बजावण्यास सांगितल आहे. (हे वाचा: EXCLUSIVE: अनेक मालिका नाकारून 8 वर्षांनी का निवडली उमेशने ‘ बरसात’?) मालिकेमध्ये रणजीत एक PSI होता. मात्र संजीवनीशी लहान वयात लग्न केल्याचा आरोप करत त्याला आपल्या पदावरून निलंबित करण्यात आलं होतं. त्यावेळी संजूने ही खाकी वर्दी पुन्हा ढाले पाटलांच्या घरी आणण्याचा चंग बांधला होता. आणि त्यानुसार रणजीतच्या भक्कम आधाराने संजूने ही वर्दी आपल्या जिद्दीने मिळवली आहे.
First published:

Tags: Marathi entertainment

पुढील बातम्या