• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पोलीस करणार का त्यांची मदत? की पुन्हा जाणार नवा बळी; 'ती परत आलीये' मालिकेत नवं वळण

पोलीस करणार का त्यांची मदत? की पुन्हा जाणार नवा बळी; 'ती परत आलीये' मालिकेत नवं वळण

'ती परत आलीये'(Ti Parat Aliye) हि मालिका सध्या सर्वांचाच थरकाप उडवत आहे. मालिकेतील दृश्ये आणि चित्रीकरण यामुळे प्रेक्षक भयभयीत होत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 15 सप्टेंबर- 'ती परत आलीये'(Ti Parat Aliye) हि मालिका सध्या सर्वांचाच थरकाप उडवत आहे. मालिकेतील दृश्ये आणि चित्रीकरण यामुळे प्रेक्षक भयभयीत होत आहेत. आता या मालिकेमध्ये एक नवं वळण आलं आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार गायब झालेल्या सर्व मित्रांचा शोध आत्ता पोलिसांनी आपल्या हाती घेतला आहे.
  काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर एक हॉरर मालिका आपल्या भेटीला आहे. 'ती परत आलीये' असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेने दहशत माजवली आहे. मालिकेतील ती जिवंत वाटणारी बाहुली आणि रात्रीच्या काळोखातील ती दृश्ये यामुळे प्रेक्षकांचा थरकाप उडत आहे. (हे वाचा:या थीमवर आधारित आहे 'Bigg Boss Marathi'चं नवं घर; नवी अपडेट आली समोर) मालिकेत सध्या एकीकडे हणमंत आपल्या गर्भवती मैत्रिणीला त्या गेस्ट हाऊसमधून बाहेर काढण्याची जबाबदारी घेत आहे. तर दुसरीकडे या सर्व मित्र-मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला आहे. आणि म्हणूनच पोलिसांनी या शोधकार्याचा वेग वाढवला आहे. आता खरंच या शोधकार्याचा काही फायदा होणार, कि पुन्हा एका मित्राचा बळी जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (हे वाचा:Bigg Boss मराठी' सीजन 3 मध्ये हे प्रसिद्ध कलाकार असणार स्पर्धक ? ) मालिकांमध्ये असं दाखविण्यात आलं आहे, कॉलेजवयीन मित्र-मैत्रिणींच्या एका ग्रुपच्या नको त्या चेष्टेमुळे एका निष्पाप मैत्रिणीचा जीव जातो. त्यांनतर हे लोक एकमेकांच्या संपर्कातून दूर जातात. मात्र तब्बल १० वर्षांनी हे लोक एकत्र त्याच गेस्ट हाऊसवर पोहोचतात, जिथे त्यांच्या मैत्रिणीचा जीव गेलेला असतो. त्यानंतर ते तेथे कैद होतात. आणि त्यातील काही मित्रांचा खूनदेखील होतो. आत्ता खरंच ती मैत्रीण आपला बदल घेण्यासाठी परत आलीय, की अन्य कोणी हा डाव करत आहे. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: