'शुभमंगल ऑनलाईन'चा बस्ता गुंडाळणार? काय असणार मालिकेचं भविष्य?

'शुभमंगल ऑनलाईन'चा बस्ता गुंडाळणार? काय असणार मालिकेचं भविष्य?

'शुभमंगल ऑनलाईन’ (shubhamangal online) मालिकेची लोकप्रियता कमी होत असल्याचं सांगितलं जातं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : काही दिवसांपूर्वीच कलर्स मराठीवरील (colors marathi) मालिका ‘चंद्र आहे साक्षिला’(chandra aahe sakshila) ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता त्या पाठोपाठ कलर्स मराठीवरील आणखी एक मालिका बंद होणार असल्याची चर्चा होत आहे. कलर्स मराठीवर प्रदर्शित होणारी 'शुभमंगल ऑनलाईन’ (shubhamangal online) ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

कलर्स मराठीवर ‘शुभमंगल ऑनलाईन’ ही मालिका काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामध्ये अभिनेत्री सायली संजीव ‘शर्वरी’ आणि अभिनेता सुयश टिळक ‘शंतनू’ ह्या मुख्य भूमिका साकारत आहेत. शंतनू आणि शर्वरीची जोडी मालिकेच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

‘शुभमंगल ऑनलाईन’ ही एक वेगळ्या धाटणीची मालिका प्रेक्षकांसमोर आणण्यात आली होती. सध्याचं युग हे ऑनलाईन बनलं आहे. प्रत्येक गोष्ट डिजिटलच्या बेडीत अडकली आहे. आजची तरुण मंडळी या माध्यमांचा पुरेपूर वापर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका आहे.

हे वाचा - VIDEO : सलमानची चाहत्यांना Manzar ची भेट; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

शर्वरी आणि शंतनू कधीही प्रत्यक्ष न भेटता फक्त ऑनलाईन माध्यमातून एकमेकांना भेटतात आणि त्यातूनच लग्नासारखा मोठा निर्णय घेतात. लग्नापर्यंत सर्वकाही व्यवस्थित पार पडतं. मात्र लग्नानंतर ऐश्वर्याची एंट्री होते आणि मालिकेला नवं वळण लागतं. ऐश्वर्या ही शंतनूची जुनी प्रेयसी असते. ती येऊन शंतनूबद्दल अनेक गैरसमज निर्माण करते आणि त्याला बळी पडतं शंतनू आणि शर्वरीचं नातं. मात्र शर्वरीच्या साथीने शंतनू या सर्वांना तोंड देत आहे. असा काहीसा या मालिकेचा आशय आहे.

हे वाचा - आम्ही लठ्ठ आहोत म्हणून...'; Body Shaming वर अक्षया नाईकची सणसणीत चपराक)

मालिका सुरू झाल्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता ऐकण्यात येत आहे की या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा विचार सुरू आहे.अभिनेता सुबोध भावे या मालिकेचा निर्माता आहे. तर सुकन्या कुलकर्णीसारखी ज्येष्ठ अभिनेत्रीसुद्धा यात काम करत आहे. आता ही मालिका खरंच बंद होणार की असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

Published by: Aiman Desai
First published: April 21, 2021, 10:37 PM IST

ताज्या बातम्या