VIDEO: नवी वकील देविसिंगला फासावर लटकवणार? की फसणार डॉक्टरच्या जाळ्यात?

VIDEO: नवी वकील देविसिंगला फासावर लटकवणार? की फसणार डॉक्टरच्या जाळ्यात?

झी टीव्हीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जून- ‘देवमाणूस’(Devmanus)  या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता अगदी ताणून धरली आहे. देवीसिंग म्हणजेच डॉ.अजित आपला गुन्हा मान्य करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ACP दिव्याने देवीसिंगला कोर्टात उभं केल आहे. डॉक्टरचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी दिव्या जीव तोडून प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे डॉक्टर आपल्याविरुद्धचा प्रत्येक पुरावा खोटा सिद्ध करण्यात लागला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी टीव्हीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या रोमांचक कथेने दर्शकांना खिळवून ठेवलं आहे. डॉक्टरचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर कधी येणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये बाबू म्हणजेच डिंपलच्या वडिलांनी साक्ष दिली आहे. सुरुवातीला ज्या आजोबांचा खून झाला होता. त्यांचा फोटो डॉक्टरने जे घरभाडं दिलं होतं, त्यामध्ये होता. यावरून नवी सरकारी वकील आर्या असा दावा करतात की, त्या आजोबांचे पैसे डॉक्टरने चोरले आणि त्यांचा खून केला. आत्ता इतक्या मोठ्या पुराव्यानंतर देवीसिंग आपला गुन्हा कबूल करेल की आणखी नवा डाव आखेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.

(हे वाचा: सुहास शिरसाट कसा झाला ‘रात्रीस खेळ चाले’मधील दत्ता नाईक?  )

ACP दिव्याने डॉक्टर अजितचं सत्य ओळखलं आहे. त्यामुळे त्याचे सर्व गुन्हे जगासमोर आणण्यासाठी ती धडपड करत आहे. जंग जंग पछाडून ती डॉक्टरविरुद्ध पुरावे शोधत आहे. मात्र डॉक्टर तिच्या प्रत्येक पुराव्याला खोटा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरने सगळ्या गावकऱ्यांनां देखिल दिव्याविरुद्ध भडकवून आपल्या बाजूने केलं आहे. मात्र दिव्या तितक्याच जिद्दीने सर्वांशी लढा देत आहे. हा लढा कधी यशस्वी होणार डॉक्टर आपला गुन्हा कधी मान्य करणार आणि त्याला शिक्षा कधी होणार याकडे प्रेक्षक टक लावून आहेत.

Published by: Aiman Desai
First published: June 10, 2021, 4:38 PM IST

ताज्या बातम्या