लागीर झालं... फेम अज्याचा धम्माल डान्स, हा VIDEO एकदा पाहाच

झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

  • Share this:
    मुंबई, 15 जून- ‘लागीर झालं जी’(Lagir Zal Ji) फेम अज्या सध्या खुपचं चर्चेत आहे. अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) सध्या आपल्या अभिनयामुळे नव्हे तर आपल्या डान्समुळे चर्चेत आहे. नितीशचे अनेक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहेत. त्यामध्ये तो धम्माल डान्स करताना दिसून येत आहे. कधी आपल्या मैत्रिणीसोबत तर कधी सोलो  डान्स व्हिडीओ नितीश शेयर करत आहे. नुकताच नितीशचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामध्ये नितीश खुपचं मजेशीर स्टेप करताना दिसून येत आहे.
    झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. अज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी आणि एका फौजीची कहाणी चाहत्यांना चांगलीच पसंत पडली होती. यामध्ये नितीश चव्हाणने अज्याची व्यक्तिरेखा साकारली होती. आणि ती खुपचं लोकप्रिय सुद्धा झाली होती. या मालिकेमुळे नितीशला खुपचं लोकप्रियता मिळाली आहे. तिचे मोठ्या प्रमाणात चाहतेसुद्धा निर्माण झाले आहेत. (हे वाचा: HBD: बालकलाकार ते प्रसिद्ध खलनायक; वाचा चेतन हंसराजचा जबरदस्त प्रवास ) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी चाहत्यांचा निरोप घेतलेला आहे. मात्र तरीसुद्धा त्यांची लोकप्रियता तशीच आहे. सध्या नितीश मालिकांपासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. नितीश इन्स्टाग्रामवर खुपचं सक्रीय आहे. तो सतत आपले खाजगी फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करत असतो. आणि चाहतेही त्याच्यावर भरभरून प्रेम करत असतात. (हे वाचा: HBD: 'त्याने मला कपडे काढून'...सोनल वेंगुर्लेकरसोबत घडला होता धक्कादायक प्रसंग  ) नुकताच नितीशने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो एका डीजे गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसत आहे. चाहतेही हा व्हिडीओ पासून खुपचं खुश आहेत. नितीशच्या चाहत्यांनी अनेक मजेशीर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. शिवाय त्यांनी अज्याला मिस करत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच ‘राजा राणीची गं जोडी’ फेम श्वेता राजनसोबतही त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी असल्याचंही म्हटलं जातं आहे. मात्र या दोघांनी आपण खास मित्र असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: