मुंबई,9 जुलै- अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे आपल्या सर्वांनाचं माहिती आहे. मात्र ती एक उत्तम माणूससुद्धा आहे. पूजा एक प्राणीप्रेमी आहे. ती सतत अनेक प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवताना दिसून येते. पूजा अनेक पक्ष्यांचा सांभाळदेखील करते. ती अनेक छोट्या-छोट्या पक्ष्यांना रेस्क्यू (Rescue Baby Birds) करते, आणि त्यांना स्वतः सांभाळते.
View this post on Instagram
अभिनेत्री पूजा सावंत मराठीमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पूजाने विविध धाटणीच्या भूमिका साकारून चाहत्यांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. फक्त मराठीचं नवे तर पूजाने बॉलिवूडमध्ये सुद्धा पदार्पण केलं आहे. हिंदी चित्रपटातही तिने अगदी उत्तम भूमिका साकारली आहे. अशी ही गुणी अभिनेत्री आपल्या रियल लाईफमध्येसुद्धा तितकीच गुणी आहे. पूजा नेहमीच अनेक पक्ष्यांना रेस्क्यू करते, आणि त्यांचं संगोपन करते. त्या लहान आणि अशक्त अशा छोट्या-छोट्या पक्षांना अगदी सिरींजने दुधदेखील देते. पूजाचं हे रूप चाहत्यांना खुपचं पसंत पडत. त्याचे तिचं खुपचं कौतुकदेखील करतात.
(हे वाचा: मानसी नाईकने सासूसोबत लावले ठुमके; VIDEO होतोय तुफान VIRAL )
नुकताच पूजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं आणखी काही नवीन पक्ष्यांचा रेस्क्यू केल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये 2 छोटे-छोटे खुपचं सुंदर असे काळ्या रंगाच्या पक्ष्याचे पिल्लू दिसून येत आहेत. या व्हिडीओचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत. तसेच लाईक्स आणि कमेंट्स करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. इतकचं नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावेनं सुद्धा कमेंट्स करत पूजाचं कौतुक केलं आहे. अभिज्ञाने तर पूजाला आपलं आयडल असं म्हटलं आहे.
(हे वाचा: तू किती मुर्ख आहे पुन्हा सिद्ध झालं’; लंडनमधील स्वातंत्र्यामुळे सोनम कपूर ट्रोल)
‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या पूजा सावंतने अनेक सुंदर भूमिका केल्या आहेत. लपाछपी, बळी सारख्या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाचा क्स दाखवला आहे. शिवायने हिंदीमध्ये पदार्पण करत अभिनेता विद्युत जामवालसोबत काम केलं आहे. पूजाच्या अभिनयाचे तर नेहमीच कौतुक होते, मात्र आत्ता पूजाच्या या माणूसकीचेसुद्धा कौतुक होतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.