बहुप्रतीक्षित 'समांतर 2' चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; पुन्हा येणार थरारक अनुभव

बहुप्रतीक्षित अशी मराठी वेबसिरीज(Marathi Webseries) ‘समांतर 2’ (Smaantar 2) चा ट्रेलर (Trailer) आज रिलीज झाला आहे.

बहुप्रतीक्षित अशी मराठी वेबसिरीज(Marathi Webseries) ‘समांतर 2’ (Smaantar 2) चा ट्रेलर (Trailer) आज रिलीज झाला आहे.

  • Share this:
    मुंबई, 21 जून- बहुप्रतीक्षित अशी मराठी वेबसिरीज (Marathi Webseries) ‘समांतर 2’ (Smaantar 2) चा ट्रेलर (Trailer) आज रिलीज झाला आहे. ‘समांतर’ या वेबसिरीजने प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवलं होतं. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर ‘समांतर 2’ चा थरारक ट्रेलर रिलीज झाला आहे. स्वप्नील जोशीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेयर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
    गेल्यावर्षी ‘समांतर’ ही वेबसिरीज आपल्या भेटीला आली होती. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या फेऱ्यात अडकलेल्या एका व्यक्तीवर आधारित हे कथानक होतं. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या थरारक घटनांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. या वेबसिरीजचे केवळ 9 एपिसोड होते. मात्र प्रत्येक एपिसोडने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. या वेबसिरीजमध्ये मराठी अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तसेच महाभारत फेम नितीश भारद्वाजसुद्धा यामध्ये महत्वाच्या भूमिकेत होते. तर नव्या भागामध्ये अभिनेत्री सई ताम्हनकरसुद्धा झळकणार आहे. (हे वाचा: Yoga Day 2021: मराठी अभिनेत्रींचा फिटनेस फंडा; असं टिकवतात आपलं सौंदर्य ) पहिल्या भागाच्या रोमांचकारी अनुभवानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून राहिली होती. काही महिन्यांनपूर्वी दुसऱ्या भागाचं शुटींग चालू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनतर स्वप्नील डबिंग आणि ट्रेलर रिलीज होणार असल्याचीसुद्धा माहिती दिली होती. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढली होती. त्यामुळे सर्वजणचं ‘समांतर 2’ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. आत्ता चाहत्यांची उत्सुकता लवकरच संपणार आहे. (हे वाचा: VIDEO: ड्रामा क्वीनचा हटके अंदाज; राखीने भररस्त्यात रिक्षावाल्या मामांना थिरकवलं ) आज ‘समांतर 2’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. याबद्दल पोस्ट शेयर करत सर्वांनाचं स्वप्नीलने ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे आत्ता चक्रपाणीचं भूतकाळ नेमकं काय होतं, आणि आत्ता कुमारच्या भविष्यकाळात काय लिहिलं आहे. हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे. ‘समांतर 2’ आपल्या सर्वांना 1 जुलैपासून एमएक्स प्लेयरवर पाहायला मिळणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: