HBD: विनोदी अभिनेता ते समाजसेवक; वाचा मकरंद अनासपुरेचा कौतुकास्पद प्रवास

अभिनेता नाना पाटेकर यांच्या सोबतीने मकरंदने ‘नाम’ या संस्थेची स्थापना केली आहे.

अभिनेता नाना पाटेकर यांच्या सोबतीने मकरंदने ‘नाम’ या संस्थेची स्थापना केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 21 जून- आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला हसवून लोटपोट करणारा अभिनेता(Marathi Actor)  म्हणजे मकरंद अनासपुरे(Makarand Anaspure)  होय. या अभिनेत्याने आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. मकरंद जितके उत्तम अभिनेता आहेत. तितकेच उत्तम माणूससुद्धा आहेत. त्यांनी अभिनेता ते समाजसेवक असा कौतुकास्पद प्रवास पार केला आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या (Birthday)  निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी. मकरंद अनासपुरे हे मूळचे मराठवाड्याचे आहेत. त्यांनी कलेचं प्राथमिक शिक्षणसुद्धा घेतलं आहे. त्यांनी औरंगाबादमधील न.भु. कॉलेजमध्ये अभिनयाचे प्राथमिक धडे घेतले होते. त्यांनी सुरुवातीपासूनचं अभिनयाची आवड होती. ही आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी कॉलेजवयापासूनचं नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. (हे वाचा:'त्याने मित्रांसमोर माझी', घटस्फोटानंतर करिश्माने केला होता धक्कादायक खुलासा  ) त्यानंतर मकरंद यांनी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता. मात्र कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांना हव्या तशा भूमिका मिळाल्या नाहीत. चित्रपटांमध्ये अगदी किरकोळ भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. त्यावेळी त्यांना जरासुद्धा अंदाजा नव्हता की ते महाराष्ट्राचे इतके मोठे विनोदवीर बनतील. मात्र त्यांच्या अस्सल अभिनयानं त्यांना यशाच्या शिखरावर न्हेवून ठेवलं होतं. महाराष्ट्राच्या विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नुकताच निधन झालं होतं. आणि त्याचंदरम्यान मकरंदने मनोरंजनसृष्टीत प्रवेश केला होता. आपल्या लाडक्या लक्षानंतर मराठीसृष्टीला एका विनोदवीराची अत्यंत गरज होती. पुढे मकरंदने आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांना भुरळ घातली होती. त्याचा अभिनय आणि त्याची बोलण्याची अनोखी शैली यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली होती. (हे वाचा: बहुप्रतीक्षित 'समांतर 2' चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; पुन्हा येणार थरारक अनुभव) चित्रपटांनंतर हा अभिनेता रियल लाईफमध्येसुद्द्धा एक ‘सुपर हिरो’ बनला आहे. मकरंदने अभिनयासोबतचं समाजसेवेचा वसा उचलला आहे. अभिनेता नाना पाटेकर यांच्या सोबतीने मकरंदने ‘नाम’ या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आणि एकंदरीतचं शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे. अशा या खऱ्या आयुष्यातील सुपरहिरोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
    Published by:Aiman Desai
    First published: