मुंबई, 11 ऑगस्ट- छोट्या पडद्यावर ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) खूपच लोकप्रिय आहे. या शोमुळे सर्वांचं टेन्शन नाहीसं होतं. त्यामुळे चाहते या शोला भरभरून दाद देतात. मात्र काही महिन्यांपासून या शो ने छोट्या पडद्यावरून विश्रांती घेतली होती. मात्र आत्ता पुन्हा एकदा हा शो आपल्याला हसवून लोटपोट करण्यासाठी सज्ज आहे. दर्शकांना या शो ची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. कपिलने नव्या सेटचे काही फोटो चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. यामध्ये काही नव्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे. तर काही जुने कलाकार गायब आहेत. कपिलच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत, डॉ. मशहूर गुलाटीशिवाय सर्व काही मोकळ मोकळं वाटत असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
नुकताच कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेटचे काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये खूपच भव्य सेट दिसून येत आहे. गेल्यावेळी पेक्षा हा सिझन थोडा वेगळा होणार असल्याचं दिसून येत आहे. कपिलने फोटो शेयर केल्या नंतर अवघ्या एका तासात 3 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. कपिल आपल्या नव्या टीमसह आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. मात्र चाहत्यांना सुनील ग्रोवरसारख्या जुन्या कलाकारांची आठवण येत आहे.
(हे वाचा:रणबीर-आलियाच्या लग्नाच्या भविष्यवाणीनंतर लारा दत्ताने ट्वीट करत म्हटलं... )
कपिलने फोटो शेयर करत, कॅप्शनमध्ये विचारलं आहे, ‘मित्रांनो नवीन सेट कसं आहे?’ यावर अनेक युजर्सनी कमेंट करत म्हटलं आहे, ‘सेट तर छान आहे, मात्र डॉ.मशहूर गुलाटीशिवाय सर्वकाही मोकळ मोकळं वाटत आहे’., तर अन्य काही युजर्सनी सुनील ग्रोवरला परत आणण्याची मागणी केली आहे. यावरूनचं चाहत्यांना सुनीलची किती कमतरता भासत आहे हे दिसून येतं. तर दुसरीकडे नव्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आपल्या ‘बेलबॉटम’च्या टीमसह उपस्थित राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.