मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जेव्हा रणबीर कपूरने बहिणीचा ड्रेस चोरून गर्लफ्रेंडला केला होता गिफ्ट...

जेव्हा रणबीर कपूरने बहिणीचा ड्रेस चोरून गर्लफ्रेंडला केला होता गिफ्ट...

‘द कपिल शर्मा शो’(The Kapil Sharma Show)मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग (Neetu Singh) आणि त्यांची कन्या रिद्धिमा साहनी (Riddhima Sahani) यांनी हजेरी लावली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 2 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’(The Kapil Sharma Show) ला नुकताच सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावत आहेत. नुकताच समोर आलेल्या नव्या प्रोमोनुसार यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग (Neetu Singh) आणि त्यांची कन्या रिद्धिमा साहनी (Riddhima Sahani) यांनी हजेरी लावली आहे. या दोघी कपिलसोबत धम्माल करताना दिसत आहेत. तसेच बहीण रिद्धिमा अभिनेता रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) पोलखोल करतानासुद्धा दिसत आहे.

‘द कपिल शर्मा शो’चा नवा प्रोमो नुकताच रिद्धिमा साहनी हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. यामध्ये रिद्धिमा आणि नीतू सिंग यांनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली आहे. रिद्धिमा ही ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची कन्या तर अभिनेता रणबीर कपूरची बहीण आहे. रिद्धिमाने शेयर केलेल्या प्रोमोमध्ये या दोघी कपिलसोबत मिळून धम्माल करत आहेत. तसेच बहीण रिद्धिमा भाऊ रणबीरची पोलखोलसुद्धा करत आहे. जे ऐकून सर्वांनाचं हसू आवरण कठीण होत आहे.

(हे वाचा: Saira Banu Health Update: सायरा बानो यांची लवकरच केली जाणार अँजिओग्राफी)

या प्रोमोमध्ये कपिल रिद्धिमाला विचारतो, की हे खर आहे का, जेव्हा तू लंडनमध्ये शिकत होतीस तेव्हा रणबीर तुझ्या वस्तू न विचारता कोणाला तरी भेट करत होता?’ यावर उत्तर देत रिद्धिमा म्हणते ‘जेव्हा मी घरी आले होते. तेव्हा रणबीरची एक फ्रेंड यावर तिला थांबवत नीतू सिंग म्हणतात, गर्लफ्रेंड..आणि यावर सर्वजण हसू लागतात. पुढे रिद्धिमा म्हणते, ‘त्याची गर्लफ्रेंड मला भेटायला आली होती. त्यावेळी तिने जो ड्रेस घातला होता अगदी तसाच एक ड्रेस माझा होता. आणि तो मला मिळत नव्हता. नंतर मला समजलं की तो माझाचं ड्रेस होता. आणि रणबीर चोरून माझ्या वस्तू आपल्या गर्लफ्रेंडला भेट करत होता. यावर दर्शकांमध्ये एकच हशा पिकतो.

(हे वाचा:VIDEO : अभिनेत्री नीना गुप्ता यांचा हॉट लूकमधील डान्स पाहून चाहते घायाळ)

नीतू आणि रिद्धिमा कपूरचा हा एपिसोड येत्या रविवारी सोनी टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. यामध्ये नीतू आणि रिद्धिमाने अनेक आठवणी शेयर केल्या आहेत. यासोबतचं रिद्धिमा इंडियन आयडॉलमध्येसुद्धा दिसून आली होती.

First published:

Tags: Bollywood, Ranbir kapoor, The kapil sharma show