मुंबई, 10 जुलै- गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या हॉलिवूडच्या (Hollywood) मार्व्हल सीरिजमधील नव्या चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी भारतीयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्कार्लेट जोहान्सनच्या मार्व्हल सिरीजमधला बहुचर्चित ‘ब्लॅक विडो’ (Black Widow) हा चित्रपट शुक्रवारी, 9 जुलै रोजी उत्तर अमेरिकेसह अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला. डिस्ने प्लस (Disney Plus), तसंच त्याच्या प्रीमियर अॅक्सेसवरही (Premier Access) 30 डॉलर्स शुल्कात हा चित्रपट बघता येणार आहे. भारतातल्या प्रेक्षकांना मात्र या आनंदापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यांना हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवरही (Disney plus Hotstar) पाहता येणार नाही. डिस्ने प्लसवर हा सिनेमा आठ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
हा सिनेमा 9 जुलै रोजीच भारतातल्या थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार होता; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या भयानक (Corona Pandemic) दुसऱ्या लाटेमुळे या सिनेमाचं थिएटरमधलं प्रदर्शन लांबणीवर पडलं. अर्थात डिस्ने प्लस या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या भारतातल्या युझर्ससाठी हा सिनेमा का प्रदर्शित करण्यात आला नाही, याबद्दलचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे कदाचित डिस्ने प्लसवर आठ ऑक्टोबर रोजी जेव्हा हा सिनेमा जगभर प्रदर्शित केला जाईल, तेव्हाच तो भारतीयांना पाहायला मिळेल, अशीच शक्यता वाटते. त्यामुळे Natasha Romanoff चा दानवांशी असलेला लढा पाहण्यासाठी भारतीयांना प्रतीक्षाच करावी लागेल.
2021मध्ये प्रत्येक सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्याच वेळी HBO Maxवरही प्रदर्शित होईल, अशी घोषणा वॉर्नर ब्रदर्सनी गेल्या वर्षी केली होती, तेव्हा जगभरातल्या मनोरंजन विश्वात चर्चा झाली होती. बहुतांश जणांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं होतं, तर काही जणांनी नाराजीही व्यक्त केली होती.
(हे वाचा: माधुरीचा 'सिंघम'अवतार पाहून रोहितही अवाक्; VIDEO होतोय VIRAL )
डिस्नेनेही गेल्या वर्षी Mulan साठी प्रीमियर अॅक्सेस मॉडेल पहिल्यांदाच वापरलं. हा सिनेमा 1998मधल्या त्याच नावाच्या अॅनिमेटेड सिनेमा लाइव्ह-अॅक्शन रिमेक होता. तो सिनेमा कोरोनामुळे थिएटर्समुळे प्रदर्शित न होता केवळ डिस्ने प्लसवरच प्रदर्शित झाला होता. राया आणि लास्ट ड्रॅगन हे सिनेमे थिएटर्स आणि स्ट्रीमिंग अशा दोन्ही माध्यमांत प्रदर्शित झाले. तो प्रयोग यशस्वी झाल्यावर क्रुएला, ब्लॅक विडो, जंगल क्रूझ हे सारे सिनेमे तोच प्रयोग करणार आहेत. वॉर्नर ब्रदर्स या दिग्गज प्रतिस्पर्ध्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला आहे, हे उघड आहे.
(हे वाचा: विकी कौशलनं असं दिलं होतं आपलं पहिलं ऑडिशन; 9 वर्ष जुना PHOTO व्हायरल)
प्रीमियर अॅक्सेसवर प्रदर्शित करण्यात आलेले सारे सिनेमे डिस्नेने काही महिन्यांनंतर मोफत उपलब्ध केले. तेच सिनेमे डिस्ने प्लस हॉटस्टारद्वारे भारतात रिलीज केले जातात. त्यामुळेच Mulan हा सिनेमादेखील चार डिसेंबरला मोफत उपलब्ध झाला आणि भारतात डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. भारतात डिस्ने प्लसचं प्रीमिअर अॅक्सेस व्हर्जन नाही. त्यामुळे ब्लॅक विडो सिनेमा भारतात थिएटर्समध्ये नऊ जुलैला प्रदर्शित झाला असता, तरी घरच्या घरी डिस्ने प्लस हॉटस्टारवर तो पाहायचा असता, तर वाट पाहावीच लागली असती. कदाचित जास्तीत जास्त लोकांनी ब्लॅक विडो हा सिनेमा थिएटर्समध्ये मोठ्या पडद्यावर, IMAXमध्ये पाहावा, अशी डिस्ने आणि मार्व्हल स्टुडिओची इच्छा असावी. कारण त्यातली दृश्य, साउंड इफेक्ट्सची खरी मजा तिकडेच येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Hollywood