मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ओळखा पाहू ही चिमुकली आहे कोण? मराठीच नव्हे दक्षिणेतही केल्यात दमदार भूमिका

ओळखा पाहू ही चिमुकली आहे कोण? मराठीच नव्हे दक्षिणेतही केल्यात दमदार भूमिका

 आपल्या बालपणाचे फोटो (Childhood Photo) शेयर करणं प्रत्येक व्यक्तीला आवडत असतं. त्यामध्ये आपल्या बऱ्याच आठवणी दडलेल्या असतात.

आपल्या बालपणाचे फोटो (Childhood Photo) शेयर करणं प्रत्येक व्यक्तीला आवडत असतं. त्यामध्ये आपल्या बऱ्याच आठवणी दडलेल्या असतात.

आपल्या बालपणाचे फोटो (Childhood Photo) शेयर करणं प्रत्येक व्यक्तीला आवडत असतं. त्यामध्ये आपल्या बऱ्याच आठवणी दडलेल्या असतात.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 मे-  आपल्या बालपणाचे फोटो (Childhood Photo) शेयर करणं प्रत्येक व्यक्तीला आवडत असतं. त्यामध्ये आपल्या बऱ्याच आठवणी दडलेल्या असतात. म्हणूनच हे फोटो आपल्यासाठी एकदम खास असतात. असंच एक खास फोटो अभिनेत्री (Actress) श्रुती मराठेने (Shruti Marathe) शेयर केला आहे. या बालपणाच्या फोटोमध्ये श्रुती आपल्या मोठ्या बहिणीसोबत दिसून येत आहे. त्यामध्ये श्रुती मजेशीर पोझ देतानासुद्धा दिसत आहे.

अभिनेत्री श्रुती मराठेनं काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला होता. हा फोटो तिच्या बालपणीचा होता. त्यामध्ये आणखी एक मुलगी दिसत आहे. जी श्रुतीच्या गालावर किस करत आहे. ही मुलगी म्हणजे श्रुतीची बहिण प्रीती मराठे आहे. या फोटोमध्ये दोघीही खुपचं गोड दिसत आहेत.

श्रुती फोटोमध्ये मजेशीर पोझसुद्धा देत आहे. त्यामुळे तिने त्या फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘सगळ्यात ड्रामा पाहिजे मला’. श्रुतीचा हा फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. बरेच चाहते फोटोवर कमेंट्स सुद्धा करत आहेत.

(हे वाचा: लक्ष्या'च्या आठवणीत सचिन पिळगांवकर झाले भावुक; Photo शेअर म्हणाले...)

श्रुतीचा जन्म पुण्यामध्ये झाला आहे. ती मूळची मराठी भाषिक असूनसुद्धा तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका तमिळ चित्रपटातून केली आहे. ‘इंदिरा विळा’ हा तिचा पहिला तमिळ चित्रपट होता. श्रुतीने ‘सनई चौघडे’ या 2008 मध्ये आलेल्या चित्रपटातून मराठीत पदार्पण केल होतं.

(हे वाचा:शिवानी बावकर चाहत्यांकडे मागतेय आर्थिक मदत; हवं आहे 16 कोटींचं इंजेक्शन  )

तसेच श्रुतीने झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेत सुद्धा काम केल आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. यामध्ये तिनं एका डॉक्टरची भूमिका साकारली होती, जी आपल्यापेक्षा कमी वयाच्या एका मुलाच्या प्रेमात पडते. राधा आणि सौरभ ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली होती.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment