Home /News /entertainment /

‘Bigg Boss 15’ च्या घरात पोहोचण्यासाठी ‘हा’ असणार बिग टास्क

‘Bigg Boss 15’ च्या घरात पोहोचण्यासाठी ‘हा’ असणार बिग टास्क

सलमाननं नुकताच ‘बिग बॉस 15’चा नवा प्रोमो आपल्या भेटीला आणला आहे.

  मुंबई,1सप्टेंबर- बिग बॉस OTTसोबत लवकरच ‘बिग बॉस 15’(Bigg Boss 15) आपल्या भेटीला येत आहे. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो म्हणून बिग बॉसला ओळखलं जातं. यावेळी बिग बॉस आधी डिजीटल माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. यावेळी बिग बॉस OTT स्वरुपात आपल्या भेटीला आला आहे. 6 आठवड्यानंतर हा शो टीव्हीवर शिफ्ट केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आत्ता लवकरच ‘बिग बॉस 15’टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचा होस्ट सलमान खानचा (Salman Khan) नवा प्रोमो (New Promo) सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
  सध्या बिग बॉस OTT दिग्दर्शक करण जोहर होस्ट करत आहे. आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं, की 6 आठवड्यानंतर हा शो टीव्हीवर शिफ्ट होताचं होस्ट म्हणून पुन्हा सलमान खानचं असणार आहे. त्यानुसार सलमाननं नुकताच ‘बिग बॉस 15’चा नवा प्रोमो आपल्या भेटीला आणला आहे. त्यानुसार बिग बॉस 15 खुपचं मनोरंजक होणार असल्याचं दिसत आहे. (हे वाचा: BB OTTमध्ये सनी लियोनीनं स्पर्धकांना दिला इतका बोल्ड टास्क, पाहा VIDEO) नव्या प्रोमोवरून लक्षात येत आहे, की स्पर्धकांना ‘बिग बॉस 15’च्या घरात एन्ट्री करण्यासाठी खुपचं कष्ट घ्यावे लागणार आहेत. या प्रोमोमध्ये सलमान एका जंगलात येऊन पोहोचला आहे. आणि तिथे एका लेडीचा आवाज येत असतो. सलमान त्याला विश्वसुंदरी असं संबोधत आहे. हा आवाज ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा आहे. तसेच यावेळी सलमान सांगतो बिग बॉस पाहायला आपल्याला खूप मज्जा येणार आहे, मात्र स्पर्धकांना एन्ट्रीसाठी खूपच मेहनत करावी लागणार आहे. स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात पोहोचण्यासाठी हा जंगल पार करावा लागणार आहे. (हे वाचा:टीव्हीची बोल्ड क्वीन निया शर्माची BB OTTमध्ये होणार तुफानी एन्ट्री  ) हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा बिग बॉसमध्ये काहीतरी नवीन असणार आहे. जंगलनंतर अजून काय काय असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment

  पुढील बातम्या