मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: डॉक्टरचा मुखवटा अखेर उतरणार; आज पाहा ‘देवमाणूस’चा शेवट एपिसोड

VIDEO: डॉक्टरचा मुखवटा अखेर उतरणार; आज पाहा ‘देवमाणूस’चा शेवट एपिसोड

झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.

झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.

झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे.

  मुंबई, 15 ऑगस्ट- ‘देवमाणूस’ (Devmanus) या मराठी मालिकेने सर्वाना अगदी खिळवून ठेवलं आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. सत्यघटनेवर आधारित या मालिकेच्या प्रत्येक भागाने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. तसेच मालिकेतील डॉक्टर ते चंदा प्रत्येक कलाकाराने आपल्या उत्तम अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. मात्र आज या मालिकेचा शेवटचा भाग (Last Episode) प्रसारित होणार आहे. मालिकेत डॉक्टरचा मुखवटा अखेर उतरणार आहे. आणि यासोबतचं ही मालिका आपला निरोप घेणार आहे.
  झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील डॉक्टर, आजी, टोण्या, डिंपल,बज्या,दिव्या ते चंदा अशा सर्वच भूमिका भाव खाऊन गेल्या आहेत. या कलाकारांनी आपल्या चोख अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. मात्र आज ही मालिका आपला निरोप घेणार आहे. मालिकेत आज डॉक्टरचं सत्य सर्वांसमोर येणार आणि या मालिकेचा शेवट होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमोसुद्धा समोर आला आहे. त्यानुसार आज दोन तासांचा विशेष्य भाग दाखवला जाणार आहे. (हे वाचा:Shershaah: सिद्धार्थ कसा बनला कॅप्टन विक्रम बत्रा; जाणून घ्या संपूर्ण किस्सा ) ही मालिका एका किलर डॉक्टरच्या सत्य घटनेवर आधारित आहे. मालिकेत डॉक्टर अजितकुमार देव अर्थातच देवीसिंगने अनेक निष्पाप महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा नाहक बळी घेतला आहे. त्याचं हे भिंग उघड पडण्यासाठी ACP दिव्या सिंग त्याला कोर्टात खेचते. मात्र आपल्या धूर्त बुद्धीने डॉक्टर सुटतो. आणि acp दिव्याचा प्रयत्न असफल होतो. डॉक्टरला हे सर्व गुन्हे लपवण्यासाठी डिंपल त्याला मदत करत असते. (हे वाचा: त्या शूटनंतर 15 दिवस आजारी होते: 'अरुंधती' साकारणारी मधुराणी प्रत्यक्षात कशी आहे) त्यानंतर मालिकेत चंदाची एन्ट्री होते. चंदा ही डॉक्टरची जुनी प्रेयसी असते. त्याला डॉक्टर हा डॉक्टर नसून एक कम्पाऊडर आहे आणि त्याचं नाव देविसंग आहे हे सत्य माहिती असतं. आज रिलीज आलेल्या प्रोमोमध्ये चंदाचं डॉक्टरचं पितळ उघडं पाडणार आहे. आणि त्यासोबतचं मालिका आपला निरोप घेणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता या मालिकेचा शेवटचा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा एपिसोड तब्बल 2 तासांचा असणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या