मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'जोधा अकबर' फेम अभिनेत्त्याची झाली गंभीर अवस्था; गुडघ्यापासून काढावा लागला पाय

'जोधा अकबर' फेम अभिनेत्त्याची झाली गंभीर अवस्था; गुडघ्यापासून काढावा लागला पाय

‘जोधा अकबर’ या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी ‘अदगा’ ही महत्वाची व्यक्तीरेखा साकारली होती.

‘जोधा अकबर’ या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी ‘अदगा’ ही महत्वाची व्यक्तीरेखा साकारली होती.

‘जोधा अकबर’ या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी ‘अदगा’ ही महत्वाची व्यक्तीरेखा साकारली होती.

मुंबई, 3 ऑगस्ट- कोरोना महामारीमध्ये (Corona Pandemic) सर्वसामान्य लोकांपासून अनेक कलाकारांपर्यंत सर्वांनाचं मोठ्या संकटातून जावं लागत आहे. कोणाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, तर कोणाला आरोग्याच्या. अशातचं ‘जोधा अकबर’(Jodha Akabar) सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलेले अभिनेता लोकेंद्र सिंग राजावतसुद्धा (Lokendra Singh Rajavat) अशाच कठीण काळातून जात आहेत. ‘जोधा अकबर’ या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी ‘अदगा’ ही महत्वाची व्यक्तीरेखा साकारली होती. आज डायबिटीजमुळे त्यांची अवस्था फारचं हलाखीची झाली आहे. धक्कादायक म्हणजे डायबिटीजमुळे त्यांचा एक पाय काढावा लागला आहे.

डायबिटीजमुळे बिघडलेल्या अवस्थेवर बोलत लोकेंद्र यांनी म्हटलं आहे, ‘डायबिटीजकडे कधीचं दुर्लक्ष करू नका. मी लॉकडाऊनच्या आधीपर्यंत व्यवस्थित काम करत होतो. मात्र लॉकडाऊनमुळे काम मिळणं कमी झालं. त्यामुळे मी घरीच होतो. आर्थिक समस्यांनासुद्धा द्यावं लागत होतं. मात्र खरं संकट तेव्हा आलं जेव्हा माझ्या जेव्हा माझ्या उजव्या पायात कॉर्न आढळलं. आणि ते थेट माझ्या बॉन मेरो पर्यंत पोहोचलं आणि हळूहळू माझ्या संपूर्ण शरीरात पसरू लागलं’.

(हे वाचा:याच दिवशी अमिताभ बच्चन यांना मिळालं होतं नवं आयुष्य; 'कुली' अपघाताची 39 वर्षे)

‘यामुळे मी खुपचं अस्वस्थ झालो होतो. कारण यातून मला वाचविण्यासाठी खुपचं कमी उपाय शिल्लक होते. त्यातीलचं एक म्हणजे माझा पाय शरीरापासून कट करून वेगळं करणं. आणि शेवटी तोच उपाय अवलंबवावा लागला. आणि माझा उजवा पाय डॉक्टरांनी गुडघ्यापासून कापला आहे. भक्तीवेदांता रुग्णालयात माझे उपचार सुरु आहेत. माझी ही सर्जरी तब्बल 5 तास चालली. आज वाईट फक्त या गोष्टीचं वाटत 10 वर्षांपूर्वी जर मी डायबिटीजला गांभीर्यने घेतलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती’.

(हे वाचा: HBD: रेडिओ ते कॉमेडी किंग; 'गुत्थी' फेम सुनील ग्रोवरचा थक्क करणारा प्रवास)

तसेच ते पुढे म्हणतात, ‘आम्हा कलाकारांची वेळ निश्चिती नसते. वेळेवर जेवणसुद्धा घेणं शक्य होतं नाही. कोणत्याही वेळेला जेवावं लागतं. त्याच्या वाईट परिणाम आमच्या शरीरावर होतो. ते म्हणाले की गोड खाण्याचं नव्हे तर यासर्व कारणांमुळे डायबिटीजची समस्या वाढते. तसेच CINTAA ने सुद्धा मला सहकार्य दिलं आहे. आणि अनेक कलाकारांनी माझ्याशी संपर्क साधून माझी विचारपूस करत मला या कठीण काळात धीर दिलां हे’.

First published:

Tags: Entertainment, Tv actor