मुंबई, 29 जुलै- ‘बिग बॉस’ (Bigg Boss Fame) फेम राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि छोट्या पडद्यावरील (Tv Actress) अभिनेत्री दिशा परमारने (Disha Parmar) नुकतंच लग्न केलं आहे. लग्नानंतरही दोघे अजून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यांची लव्हस्टोरी बिग बॉस 14 पासूनचं चाहत्यांना पसंत पडत आहे. जरी दिशा बिग बॉसची स्पर्धक नसली तरीसुद्धा राहुलसाठी तिने या शोमध्ये हजेरी लावली होती. आणि बिग बॉसच्या घरातचं राहुलने दिशाला प्रपोजसुद्धा केलं होतं. त्यांनतर यांची लव्हस्टोरी सोशल मीडियावर चांगलीचं चर्चेत होती. आत्ता हे दोघे लव्हबर्ड्स लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर दिशा आणि राहुलचा एक लाईव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यामध्ये एका चाहत्याने दिशाला सिंदूर न लावण्या मागचं कारण विचारलं आहे. आणि त्यावर दिशानेसुद्धा खास अंदाजात उत्तर दिलं आहे.
View this post on Instagram
नुकताच राहुल वैद्यने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाईव्ह येत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच चाहत्यांशी संवाददेखील साधला आहे. यावेळी अभिनेत्री आणि पत्नी दिशासुद्धा त्याच्यासोबत होती. व्हिडीओच्या सुरुवातीला या दोघांनीही मजामस्ती केली. त्यानंतर त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली आहेत. याच दरम्यान एका चाहत्याने दिशाला प्रश्न विचारत म्हटलं आहे, ‘लग्नानंतरही कुंकू का नाही लावत’? यावर दिशानेसुद्धा हसत हसत आपलं उत्तर दिलं आहे. उत्तर देत दिशाने म्हटलं आहे, ‘यांनी लावलंचं नाही. पती राहुलकडे बोट दाखवत दिशा म्हणते, यांच्याकडे वेळचं नाही मला कुंकू लावायला. कारण यांनी बिग बॉसमध्ये सांगितलं होतं, की मला लग्नान=नंतर दररोज हे कुंकू लावतील’.
(हे वाचा: तब्बल 2 वर्षांपासून शाकाहारी आहे श्रद्धा कपूर; अभिनेत्रीनं सांगितलं खास कारण)
तसेच दिशा आपल्या हातातील चुडा दाखवत म्हणते. पाहा मी हे घातलं आहे. याआधी राहुल वैद्य आणि दिशाला आशिर्वाद देण्यासाठी तृतीयपंथी पाहुणे घरी आले होते. या लोकांनी राहुल आणि दिशासोबत धम्माल डान्सही केला होता. आणि नंतर या दोघांना आपला आशिर्वाददेखील दिला आहे. त्यांनी दिशा आणि राहुलला सांगितलं की ते पूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्येदेखील जातात. त्यांनी या नवीन जोडप्याची नजरदेखील काढली. त्यांच्याकडून आशिर्वाद मिळाल्याने हे दोघेही खुपचं आनंदी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment