मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कपिल शर्माचा चक्क शालेय अभ्यासक्रमात समावेश, चौथीच्या पुस्तकात असणार त्याच्यावर धडा

कपिल शर्माचा चक्क शालेय अभ्यासक्रमात समावेश, चौथीच्या पुस्तकात असणार त्याच्यावर धडा

काय सांगता! कपिल शर्माचा आता शाळकरी विद्यार्थी अभ्यास करणार. ही बातमी कपिलनंच आपल्या सोशल मीडिया हँललवरून दिली आहे.

काय सांगता! कपिल शर्माचा आता शाळकरी विद्यार्थी अभ्यास करणार. ही बातमी कपिलनंच आपल्या सोशल मीडिया हँललवरून दिली आहे.

काय सांगता! कपिल शर्माचा आता शाळकरी विद्यार्थी अभ्यास करणार. ही बातमी कपिलनंच आपल्या सोशल मीडिया हँललवरून दिली आहे.

मुंबई, 10 एप्रिल- आजपर्यंत आपण संत, स्वातंत्र्यसैनिक किंवा अन्य देशभक्तांचा शालेय जीवनात अभ्यास(study)केला आहे. म्हणजेच त्यांच्या सोबत घडलेल्या घटना किंवा देशासाठी असणारा त्यांचा वाटा या गोष्टींचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये (syllabus) होता. मात्र आत्ता चक्क टीव्हीवरील एका हास्यसम्राटाचा (kapil Sharma show) धडा शाळकरी मुलांच्या अभ्यासक्रमात असणार आहे. काय आश्चर्य वाटलं ना? हो हे खरं आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा (kapil sharma In school syllabus) समावेश आता शालेय अभ्यासक्रमात झाला आहे. कपिलनं स्वतः याबद्दलची माहिती आपल्या सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

कपिल शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो कपिलच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये कपिलचा एक धडा दिसून येतं आहे. आणि त्याचं नाव आहे’द कॉमेडी’. या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहे. कपिलचं पूर्ण वर्णन देण्यात आलं आहे. आणि कपिलचे काही फोटोसुद्धा यात देण्यात आले आहेत. यातील एका फोटोमध्ये कपिल आपल्या कॉमेडी शोमधील सहकलाकारांसोबत उभा असलेला दिसत आहे. तर एका फोटोमध्ये तो नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot siddhu) यांच्यासोबत दिसून येत आहे. तर तर तिसरा फोटो कपिलच्या ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटातील आहे. चौथीच्या विध्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हा धडा समविष्ट करण्यात आला आहे.

कपिलचे अफाट चाहते आहेत. त्याचे विनोद लोकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. मात्र कपिलला हे यश सहज मिळालेलं नाही. यासाठी कपिलनं खूप मेहनत घेतली आहे. कपिलच्या अगदी कमी वयात त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. तो काळ कपिल आणि त्याच्या कुटुंबासाठी खुपचं कठीण होता. कपिल आपल्या बऱ्याच मुलाखती दरम्यान याबद्दल सविस्तर बोलला आहे. कपिल सुरुवातीच्या काळात देवीच्या जागरणमध्ये गाणी गातं होता. त्यानं स्टँडअप कॉमेडीयन म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आता त्याला टीव्हीवरील कॉमेडी किंग म्हणून ओळखलं जातं.

(हे वाचा:बॉलीवूडचे हे प्रसिद्ध कलाकार आहेत एकमेकांचे जवळचे नातेवाईक, माहीत आहे का नातं? )

कपिलनं देशातील तसेच देशाबाहेरील प्रत्येक मोठ्या शहरात आपले कार्यक्रम केले आहेत. आणि त्यासाठी तो मोठी रक्कम सुद्धा घेतो. बॉलीवूडमधील मोठमोठे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रोमोशन साठी कपिलच्या कार्यक्रमात न चूकता हजेरी लावतात.

कपिल शर्मा आधी कलर्स वाहिनीवरील ‘कॉमेडी नाईटस विथ कपिल’ या कार्यक्रमात झळकत होता. त्यांनतर त्यानं ‘द कपिल शर्मा शो मधून’ सोनी वाहिनीवर पुनरागमन केलं होतं. फेब्रुवारीमध्ये हा कार्यक्रम बंद झाला होता. मात्र आता परत मे महिन्यापासून हा कार्यक्रम टीव्हीवर परतणार आहे.

First published:
top videos

    Tags: Comedy actor, Kapil sharma, Tv shows