Home /News /entertainment /

Shocking: नोरावर भडकली भारती सिंग; स्टेजवरून फरफटत केलं बाहेर

Shocking: नोरावर भडकली भारती सिंग; स्टेजवरून फरफटत केलं बाहेर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. यामध्ये नोरा फतेही, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया दिसून येत आहेत.

  मुंबई, 31 जुलै- भारती सिंग (Bharati Singh) हे टीव्हीवरील एक प्रचंड लोकप्रिय नाव आहे. भारती आपल्या विनोदाने सर्वांनाचं हसवून लोटपोट करते. भारती ज्या ठिकाणी असते, तेथे फक्त धम्माल आणि मज्जामस्तीचं असते. ती प्रत्येक कलाकारांसोबत धम्माल करताना दिसते. भारती सध्या ‘डान्स दिवाने 3’ (Dance Diwane 3) हा शो होस्ट करताना दिसते. सोबतचं तिचा पती हर्ष लिंबाचियासुद्धा तिला यामध्ये साथ देतो. नेहमीचं सर्वांना हसवणारी भारती यावेळी मात्र खुपचं रागात दिसून आली. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. यामध्ये भारती अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) स्टेजवर फरफटत न्हेताना दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@bollykaahanii)

  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. यामध्ये नोरा फतेही, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया दिसून येत आहेत. भारती आणि नोरा हर्षसोबत सुप्रसिद्ध ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ या गाण्यावर डान्स करत आहेत. मात्र नोराचं हर्षच्या एकदम जवळ जात डान्स करणं भारती अजिबात रुचलेलं नाहीय. त्या दोघांना डान्स करताना पाहून भारतीसुद्धा स्टेजवर येते. आणि नोरा व हर्षसोबत आपणही डान्स करू लागते. आणि मजे मजेत नोरा आणि हर्ष खाली पडतात. यावेळी भारती नोराला फरफट स्टेजवरून घेवून जाते. यावेळी हर्ष तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. असा हा मजेशीर व्हिडीओ आहे. (हे वाचा: अभिज्ञा-अंकिताची धम्माल; पाहा 'पवित्र रिश्ता 2' च्या सेटवरील VIRAL व्हिडीओ) या व्हिडीओमध्ये दिसत आहे की भारती, नोरा आणि हर्षची ही धम्माल मस्ती पाहून शोचे इतर परीक्षक खुपचं आनंद घेत आहेत. तसेच या त्रिकुटाची धम्माल प्रेक्षकांनासुद्धा खुपचं पसंत पडली आहे. लवकरच भारती सिंग ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसणार आहे. यासाठी चाहते खुपचं उत्सुक झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Nora fatehi, Tv shows

  पुढील बातम्या