मुंबई, 17 जून- मनोरंजन क्षेत्रात अनेक धक्कादायक गोष्टी घडत असतात. अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचं आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेले ऐकायला मिळत असतं. असाचं एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मल्याळम (
Malayalam Actress) अभिनेत्री रेवती संपतने (
Revtahy Samptha) तब्बल 14 कलाकारांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे.
रेवती संपत या मल्याळम अभिनेत्रीने नुकताच आपल्या फेसबुक पेजवर एक नावांची यादी शेयर केली आहे. आणि या लोकांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. यामध्ये तब्बल 14 लोकांची नावे आहेत. या यादीमध्ये साउथच्या ओळखीच्या चेहऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये दिग्दर्शक राजेश टचरिवर, अभिनेता सिद्दीक्कीसोबत इतर 12 लोकांचाही समावेश आहे. रेवतीच्या या पोस्टमुळे सर्वांना धक्का बसला आहे.
या लोकांची नावे जाहीर करत रेवतीने म्हटलं आहे, ‘मी यामध्ये वैयक्तिक आणि सायबरच्या माध्यमातून माझ्याशी गैर पद्धतीने वागणाऱ्या लोकांची नावे जाहिर केली आहेत. या सर्व लोकांनी माझा मानसिक तसेच शारीरक छळ केला आहे.’ असं अभिनेत्रीने शेयर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
(हे वाचा:
अवघ्या चाळीशीत 'या' अभिनेत्रींनी घेतला होता जगाचा निरोप; पाहा PHOTO )
कोणकोणत्या नावांचा आहे समावेश?
मल्याळम अभिनेत्री रेवती संपतने जाहीर केलेल्या यादीत एकूण 14 नावांचा समावेश आहे. अभिनेता सिद्दिकी, दिग्दर्शक राजेश टचरिवर, अभिनेता शिजू आर., फोटोग्राफर आशिक माही, शॉर्ट फिल्म दिग्दर्शक मेक्सवेल जोस, नंदू अशोकन, अभिल देव, सौरभ कृष्णन, एम. एसएसएस, जाहिरात दिग्दर्शक शानूब करूवथ, चोकास केक, डॉक्टर अजय प्रभाकर इत्यादींच्या नावांचा समावेश आहे.
तसेच अभिनेता सिद्दिकीवर मी याआधीसुद्धा हा आरोप केला आहे. मात्र त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असं या अभिनेत्रीने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.