• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ओळखली का कोण आहे ही चिमुकली? आज बॉलिवूडवर करते राज्य

ओळखली का कोण आहे ही चिमुकली? आज बॉलिवूडवर करते राज्य

बॉलिवूड कलाकारांनासुद्धा (Bollywood Star) आपलं बालपण सतत आठवत असत. आज या फोटोमधील ही चिमुकलीसुद्धा एक बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

 • Share this:
  मुंबई, 12 जून-  ‘लहानपण देगा देवा’ असं (Childhood)  प्रत्येकजण आवर्जून म्हणत असतो. बालपणात आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असतो. कोणतीही स्पर्धा नसते किंवा कोणतंही स्वप्न नसतं. त्यामुळे आपण प्रत्येक क्षण अगदी निरागसपणाने जगत असतो. म्हणूनचं बालपणीच्या आठवणी सर्वांना हव्याहव्याशा वाटतात. बॉलिवूड कलाकारांनासुद्धा (Bollywood Star)  आपलं बालपण सतत आठवत असत. आज या फोटोमधील ही चिमुकलीसुद्धा एक बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पाहूया कोण आहे ही गोंडस मुलगी.
  या फोटोमधील ही गोंडस मुलगी अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आहे. अनुष्का शर्मा हे आज बॉलिवूडमधील एक खूप प्रसिद्ध नाव बनलं आहे. अनुष्काचा जन्म अयोध्यामध्ये झाला आहे. मात्र तिचे आईवडील गढवाल, उत्तराखंडमधील आहेत. तिचे वडील एक आर्मी ऑफिसर आहेत. त्यामुळे अनुष्काचं शिक्षण आर्मी स्कुलमध्येच झालं आहे. अनुष्काने बेंगलोरमध्ये कला शाखेत पदवी घेतली आहे. अनुष्का मॉडलिंगसाठी मुंबईमध्ये आली होती.
  अनुष्काला अभिनयात फारशी रुची नव्हती. तिला मॉडेल म्हणून नाव कमवायचं होतं. सुरुवातीला तिने अनेक जाहिरातींसाठी काम केल होतं. त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला होता. यश चोप्रा यांच्या ‘रब ने बना दि जोडी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. आपल्या पहिल्याच चित्रपटात तिला किंग खान शाहरुख खानसोबत स्क्रीन शेयर करायला मिळाली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यांनतर अनुष्काने कधीच मागे वळून पाहिले नाही. (हे वाचा: म्हणून मी तो बाम नाही लावला', अशोक सराफ यांचा थक्क करणारा किस्सा ) अनुष्काने पीके, जब तक है जान, दिल धडकने दो, बँड बाजा बारात, बॉंबे वेलवेट, बदमाश कंपनी, ये दिल है मुश्कील अशा अनेक मोठ्या चित्रपटात काम केल आहे. अनुष्काने निर्माती म्हणूनसुद्धा बॉलिवूडमध्ये ओळख बनवली आहे. तसेच तिने स्वतःची निर्मिती संस्थाही स्थापन केली आहे. यामध्ये अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती तिने केली आहे. अनुष्काने भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केलं आहे. या दोघांची केमेस्ट्री चाहत्यांना खुपचं आवडते. आज या जोडीला वामिका नावाची एक गोंडस मुलगी आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: