अंडरवर्ल्ड डॉन सोबत आर्थिक संबंध, शिल्पा शेट्टीच्या पतीची ED करणार चौकशी

अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत राज कुंद्रांचे आर्थिक संबंध असल्याचं EDला आढळून आल्यानं ही चौकशी होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2019 11:24 PM IST

अंडरवर्ल्ड  डॉन सोबत आर्थिक संबंध, शिल्पा शेट्टीच्या पतीची ED करणार चौकशी

मुंबई 28 ऑक्टोंबर : बलीवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा वादात सापडले आहेत. राज कुंद्रांची ED चौकशी करणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत राज कुंद्रांचे आर्थिक संबंध असल्याचं EDला आढळून आल्यानं ही चौकशी होणार आहे. ED ने त्यासंबंधी कुंद्रा यांना नोटीस दिली असून  पुढच्या महिन्यात 4 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे असं वृत्त ANI ने दिलं आहे. राज कुंद्रा यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचले बॉलिवूड तारे-तारका,PHOTOS पाहिलेत का

इक्बाल मिर्चीच्या संपत्तींचा व्यवहार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रणजीत सिंह बिंद्रा आणि कुंद्रा यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचं आढळून आलंय. मिर्चीच्या 225 कोटींच्या व्यवहाराप्रकरणी बिंद्राला अटक करण्यात आली होती. बिंद्राची रिअल इस्टेट कंपनी RKW डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इसेन्शल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड यांच्या आर्थिक व्यवहार झाले आहेत. इसेन्शल हॉस्पिटॅलिटीमध्ये शिल्पा शेट्टीही संचालक आहे.

राणू मंडल यांचा आणखी एक VIDEO VIRAL, सेटवर साजरी केली दिवाळी

Loading...

बिंद्रा च्या कंपनीने शिल्पा शेट्टीच्या कंपनीत 44.11 कोटींची गुंतवणूक केली होती. आणि 31.54 कोटींचं बिनव्याजी कर्ज दिलं होतं. शिल्पा च्या कंपनीला एप्रिल 2017 ते मार्च 2018 दरम्यान 30.45 कोटी रुपये आणि एप्रिल 2016 ते मार्च 2017 दरम्यान 117.17 कोटी रुपयांचं कर्ज मिळालं होतं. याच व्यवहाराबाबत ही चौकशी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 11:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...