प्रसिद्ध निर्माता पडले Vaccine घोटाळयाला बळी; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

तौरानी यांनी 29 मे ते 3 जून दरम्यान व्हॅक्सिनेशन प्रोग्रामचं आयोजन केलं होतं. त्यांच्या सर्व स्टाफचं लसीकरण झालं मात्र कोणालाही अद्याप सर्टिफिकेट मिळालेलं नाही.

तौरानी यांनी 29 मे ते 3 जून दरम्यान व्हॅक्सिनेशन प्रोग्रामचं आयोजन केलं होतं. त्यांच्या सर्व स्टाफचं लसीकरण झालं मात्र कोणालाही अद्याप सर्टिफिकेट मिळालेलं नाही.

  • Share this:
मुंबई, 18 जून-  कोरोनाविरोधातील लढ्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे देशात लसीकरण (vaccination drive) मोहिम राबवली जात आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना लसीकरणासाठी स्लॉट बूक करता येत नाहीय. अशातच काही लोक ओळखीचा फायदा घेऊन लसीकरण करुन घेत असल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. शिवाय पैसे देऊन किंवा आरोग्य कर्मचारी असल्याचं खोटं ओळखपत्र (fake ID card)  बनवून लस घेतल्याचंही अनेक प्रकार घडले आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईत व्हॅक्सिनेशन घोटाळा उघडकीस आला असून बॉलिवूडचे प्रसिद्ध प्रोड्युसर रमेश तौरानी (producer Ramesh Taurani)  या घोटाळ्याचे शिकार झाले आहेत. रमेश तौरानी यांनी त्यांच्या स्टाफसाठी व्हॅक्सिनेशन प्रोग्रामचं (vaccination program) आयोजन केलं होतं. या प्रोग्राममध्ये त्यांच्या तब्बल 356 कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. मात्र, एवढे दिवस उलटूनही त्यांच्या एकाही कर्मचाऱ्याला व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट (certificate) देण्यात आलेलं नाही. तौरानी यांना या प्रकरणावर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. (हे वाचा:अबब! विजयने तर थलाइवा रजनीकांतलाही टाकलं मागे; घेतलं चक्क 'इतकं' कोटी मानधन   ) झालं असं की, तौरानी यांनी 29 मे ते 3 जून दरम्यान व्हॅक्सिनेशन प्रोग्रामचं आयोजन केलं होतं. त्यांच्या सर्व स्टाफचं लसीकरण झालं मात्र कोणालाही अद्याप सर्टिफिकेट मिळालेलं नाही. तौरानी म्हणाले, माझ्या स्टाफमधील लोकांनी सर्टिफिकेटसाठी व्हॅक्सिन देणाऱ्या लोकांशी संपर्क साधला तेव्हा 12 जूनपर्यंत सर्टिफिकेट मिळतील, असं सांगण्यात आलं. मात्र, अजूनही कोणालाच सर्टिफिकेट मिळालेलं नाही. आम्ही 356 जणांचं लसीकरण केलं असून लसीचे 1200 रुपये आणि जीएसटी रक्कम भरली आहे. मात्र, मला पैशांची चिंता नाहीय. मात्र ती नेमकी कोव्हिशिल्ड लस होती की सलाईनचं पाणी याबद्दल शंका येतीए, असंही ते म्हणाले. (हे वाचा: खतरों के खिलाडी 11' च्या सेटवर मोठा अपघात; अभिनेता वरुण सूद जखमी  ) दरम्यान, या लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्टिफिकेट कोकीलाबेन रुग्णालयात मिळेल असं सांगितलं होतं. तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी तौरानी यांच्या प्रॉडक्शन हाऊससोबत संपर्क साधला आहे. त्यानंतर हे प्रकरण वर्सोवा पोलिसांना सोपवण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.  लसीच्या घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. लस घेतल्यानंतर सर्टिफिकेट हे तिथेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दिलं जातं किंवा तुम्ही जर को-विन पोर्टलवर नोंदणी केली असेल तर तुम्ही लस घेतल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो. मेसेजमध्ये लिंक दिली असते त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
Published by:Aiman Desai
First published: