'कबीर सिंह' मागे टाकत 'या' चित्रपटाने 2019मध्ये जमवला सर्वात जास्त गल्ला!

'कबीर सिंह' मागे टाकत 'या' चित्रपटाने 2019मध्ये जमवला सर्वात जास्त गल्ला!

हा ट्रेंड असाच राहिल्यास हा चित्रपट सलमान खान-अनुष्का शर्माच्या सुल्तानलाही मागे टाकणार आहे.

  • Share this:

मुंबई 21 ऑक्टोंबर :  बॉलीवुड (Bollywood) चे सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff ) यांच्या 'वॉर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातलाय. चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरच्या युद्धात 'वॉर'ने बाजी मारली असून आत्तापर्यंत 291.05 कोटींचं कलेक्शन जमवलं असून 300 कोटींच्या अगदी जवळ 'वॉर' पोहोचलं आहे. त्यामुळे 'वॉर'ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या कबिर सिंह आणि धूम-3 लाही मागे टाकलंय. ट्रेड Trade Analyst तरण आदर्श यांनी ही माहिती ट्विटरवर दिलीय. तिसऱ्या आठवड्यात 'वॉर'ने एकूण 4.35 कोटींचा व्यवसाय केलाय. या चित्रपटाची तमिळ-तेलुगू आवृत्ती सोडली तर 'वॉर'चं कलेक्शन 295.75 कोटी एवढं आहे. 'वॉर'च्या हिंदी आवृत्तीने जवळपास 3 कोटींचा व्यवसाय केलाय. तर एकूण कलेक्शन 277.95 कोटी झालंय.

रामायणातील 'सीता माँ' रिअल लाइफमध्ये आहे ग्लॅमरस, पाहा तिचे Latest Photo

'वॉर'ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या कबिर सिंह आणि धूम-3 लाही मागे टाकलंय. हा ट्रेंड असाच राहिल्यास वॉर सलमान खान-अनुष्का शर्माच्या सुल्तानलाही मागे टाकणार आहे. एवढच नाही तर विदेशातही 'वॉर'ने बक्कळ कमाई केलीय. अमेरिका, युएई आणि ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत 12.10 मिलियन डॉलर म्हणजे 86.04 कोटींची कमाई वॉरने केलीय. दिवाळीच्या सुट्ट्यामुळेही वॉर ला फायदा होण्याची शक्यता आहे.

सलमान खानचे 'हे' 5 सुपरहिट सिनेमे आहेत साउथचे रिमेक

कपिलचं मानधन माहित आहे का तुम्हाला?

सोनी टीव्हीवरील कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं सकाळी 7 वाजता शूटिंग ठेवल्यानं या शोची सगळीकडेच खूप चर्चा झाली. अक्षय कुमार रोज सकाळी लवकर उठतो याउलट कपिल शर्माच्या शोचं शूटिंग नेहमीच रात्री उशीरापर्यंत चालतं. मात्र अक्षयमुळे यावेळी या एपिसोडचं शूटिंग सकाळी ठेवण्यात आलं होतं. शनिवारी जेव्हा या शोचा एपिसोड प्रसारित झाला त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर झोप स्पष्ट दिसत होती. तर या पूर्वी चंकी पांडे तर या शोच्या शूटिंगच्यावेळी झोपले नव्हते. तसेच पार्श्वगायक उदित नाराण यांनी सुद्धा या शोमध्ये सहपरिवार हजेरी लावली. उदित नारायण जसे या शोमध्ये आले त्यावेळी सर्वांच्या मनात त्यांचा एक प्रश्न पुन्हा एकदा आला की एका एपिसोडसाठी कपिल शर्मा एका एपिसोडसाठी किती पैसे घेतो.

रितेशच्या Love You मेसेजला विद्याकडून KISSING रिप्लाय, नेमकं काय आहे प्रकरण

उदित नारायण या आधीही या शोमध्ये येऊन गेले होते. जेव्हा ते पहिल्यादा आले होते त्यावेळी कपिलनं त्यांना म्हटलं, उदितजींचा आवाज जेवढा गोड आहे त्यापेक्षा त्यांचा चेहरा निरागस आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं की त्यांनी आजपर्यंत कोणाचाही पैसे थकबाकी ठेवलेला नाही पण सर्वांनी त्यांचे पैसे द्यायचे मात्र ठेवले आहेत. त्यावर उत्तर देताना उदितजी म्हणाले, तुला तर काही त्रास नसेल. ऐकलं आहे की तु आजकाल एका एपिसोडसाठी 1 कोटी रुपये फी घेतोस. त्यानंतर कपिलने कुठलंही उत्तर दिलं नसल्याने त्याची चर्चा सुरू झाली.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 20, 2019, 11:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading