मुंबई, 19 जून- बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांची जितकी चर्चा होते. तितकीच या कलाकरांच्या खाजगी आयुष्याचीदेखील होते. बॉलिवूडमध्ये अशा काही लव्हस्टोरी(Love Story) आहेत, ज्या कधीही विसरणं शक्य नाही. त्यांच्या लव्हस्टोरी तर खूप गाजल्या मात्र हे नातं लग्नापर्यंत नाही पोहचू शकलं. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) आणि रेखा यांच्या जोडीचादेखील समावेश होतो. या दोघांच्या लव्हस्टोरीचे बरेच किस्से ऐकायला मिळतात. मात्र या दोघांनीही कधीचं जगासमोर आपल्या नात्याचा स्वीकार केला नाही.
या जोडीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांमध्ये हिरोगिरी करून खलनायकांना धूळ चारणारे अमिताभ बच्चन आपल्या रियल लाईफमध्ये मात्र खुपचं शांत आहेत. मात्र एकवेळ अशी आली होती, की त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी सगळ्यांसमोर एका व्यक्तीला मारलं होतं. आणि अभिनेत्री रेखा हेचं त्यापाठीमागचं कारण होतं, असं म्हटलं जात. चला तर मग पाहूया काय आहे नेमका किस्सा.
(हे वाचा:अबब! विजयने तर थलाइवा रजनीकांतलाही टाकलं मागे; घेतलं चक्क 'इतकं' कोटी मानधन )
सन 1977 मध्ये ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाचं शुटींग सुरु होतं. यासाठी अमिताभ बच्चन आणि रेखा राजस्थानमधील जयपूरमध्ये होते. त्यावेळी या दोघांना पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती. आणि अशातच एका व्यक्तीने रेखावर अश्लील कमेंट द्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्या व्यक्तीला अनेकवेळा समजावून सांगण्यात आलं. तरीसुद्धा तो रेखा यांच्याबद्दल चुकीच्या कमेंट देतचं राहिला.
(हे वाचा:बॉलिवूडचा हिरो अक्षय कुमार भेटला काश्मीर सीमेवरच्या रिअल लाइफ हिरोंना..PHOTO )
त्यामुळे अमिताभ बच्चन यांना प्रचंड राग आला. आणि त्यांनी काहीही न बघता त्या लोकांच्या जमावासमोरचं त्या व्यक्तीला मारहाण केली. त्यामुळे तेथील इतर लोकांना मध्ये येऊन त्यांना थांबवावं लागलं. या घटनेनंतर अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याबद्दल जास्तच चर्चा रंगल्या होत्या. यासिर उस्मान यांनी रेखावर लिहिलेल्या बयोपिक ‘रेखा; द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये या गोष्टींचा उल्लेख केला होता. त्यानुसार जयपूरच्या या घटनेनंतर त्या दोघांच्या अफेयरच्या चर्चांनी अजूनचं जास्त जोर धरला होता. मात्र या दोघांनीही कधीचं आपल्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाहीय. तरीसुद्धा आजही त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा होतं असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Rekha