मुंबई, 6 जुलै- छोटा पडदा (
Tv) ते बॉलिवूडमध्ये (
Bollywood) एक उत्तम सहाय्यक अभिनेत्री (
Actress) म्हणून शगुफ्ता (
Shagufta Ali) अली यांना ओळखलं जातं. आज या ज्येष्ठ अभिनेत्री आर्थिक संकटात आहेत. या अभिनेत्रीने तब्बल 36 वर्षे मनोरंजन क्षेत्रात काम केलं आहे. 15 पेक्षा अधिक चित्रपट आणि 20 मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. मात्र इतकं असूनदेखील आपल्या आजारपणामुळे त्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. बरेच दिवस झालं त्यांच्याकडे काम नसल्याने त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.
स्पॉटबॉयच्या एका वृत्तानुसार, शगुफ्ता अली यांनी खुलासा केला आहे, की त्या गेली 20 वर्षे आजारी आहेत. नंतर समजलं की त्यांना कॅन्सरने ग्रासलं आहे. मात्र त्यावेळी हे अगदी कमी प्रमाणात होतं. त्यामुळे त्यांची तब्येत चांगली होती. मात्र सध्या त्या कॅन्सरच्या थर्ड स्टेजला आहेत. त्यांनी म्हटलं आहे, मी पहिल्यांदा ही गोष्ट माध्यम्मांना सांगत आहे. मी या अवस्थेत आहे, हे माझ्या जवळच्या काही मित्रांव्यतिरिक्त कोणालाच माहिती नाही. त्याना स्तनाचा कॅन्सर झाला आहे. आणि त्याची थर्ड स्टेज होती. त्यामुळे त्यांना तात्काळ सर्जरी करावी लागली होती.
(हे वाचा:
श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ; 'त्या' प्रकरणामुळे पतीने घेतली कोर्टात धाव )
तसेच त्यांनी सांगितलं, ‘त्यांनी किमोथेरपी घेतली होती. ती इतकी भयानक होती की प्रत्येकवेळी एक नवा जन्म घेतल्यासारखं वाटतं होतं. मात्र त्या आपल्या कामाबद्दल इतक्या एकनिष्ठ होत्या. की किमोथेरपीनंतर फक्त 17 दिवसांनी शुटींगसाठी दुबईला गेल्या होत्या. तसेच शुटींगदरम्यान त्यांच्यासोबत काही अपघात घडले होते. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्या आपल्या वडिलांना बघण्यासाठी जात असताना, त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या हातात स्टीलची रॉड बसवावी लागली होती.
(हे वाचा:
HBD: 'या' प्रसिद्ध क्रिकेटरने रणवीरला कोचिंग देण्यास दिला होता नकार )
तसेच गेल्या 6 वर्षांपासून त्यांना मधुमेहाचा त्राससुद्धा सुरु आहे. त्यांनी सध्या खुपचं वाईट काळ सुरु असल्याचं म्हटलं आहे. कलर्स टीव्हीवरील ‘बेपानाह’ मध्ये त्या काम करत होत्या, मात्र गेल्या चार वर्षांपासून त्या शोमधून बाहेर होत्या. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांनी म्हटलं की शेवटी त्यांनी ‘साथ निभाना साथिया’ मालिकेचं संपूर्ण शुटींग केल होतं. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आपले दागिने, कारसुद्धा विकून टाकली आहे.इतकच नव्हे तर डॉक्टरकडे जाण्यासाठी त्यांना आत्ता रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी मला आर्थिक मदतीची गरज असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.