Home /News /entertainment /

फाटक्या जीन्समध्ये मलायकाचा कूल अंदाज; फोटोतून देतेय Fitness गोल

फाटक्या जीन्समध्ये मलायकाचा कूल अंदाज; फोटोतून देतेय Fitness गोल

46 वर्षांची मलायका आजही खुपचं तरुण आणि सुंदर दिसते.

  मुंबई, 13 जुलै- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. चाळीशी पार असलेल्या मलायकाचं सौंदर्य आजही चाहत्यांना घायाळ करत. नुकताच मलायकाने एक नवा फोटो शेयर केला आहे. या फोटोने नेहमीसारखंचं पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
  46 वर्षांची मलायका आजही खुपचं तरुण आणि सुंदर दिसते. यापाठीमागे तिची मेहनतसुद्धा आहे. कारण मलायका न चुकता योगा आणि एक्सरसाईज करून जिममध्ये घाम गाळत असते. मलायकालाचा फिटनेस आणि स्टाईल बऱ्याच तरुणी फॉलो करतात. अनेक तरुणी तिला स्टाईल आयकॉनसुद्धा मानतात. मलायका सतत आपल्या हटके लुकमुळे चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती ट्रोलसुद्धा होते. मात्र तिला यासर्वांचा काही फरक नाही पडत. ती खुपचं बिनधास्त आणि बोल्ड आहे. (हे वाचा:'तू तर महाराष्ट्राचा रणवीर सिंग'; अभिजीत खांडकेकरचा हटके LOOK चर्चेत ) नुकताच मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये मलायकाने क्रॉप टॉप आणि रीप्ड जीन्स घातलेली आहे. ज्याला सर्वसामान्य माणूस फाटकी जीन्स म्हणतो. मात्र या लुकमध्ये मलायका खुपचं कुल दिसत होती. मलायकाने फोटो शेयर करत त्याला एक खास कॅप्शनसुद्धा दिलं आहे, ‘मास्क, रीप्ड जीन्स, क्रॉप टॉप... हा माझा मन्डे मूड’ या आशयाचा कॅप्शन मलायकाने दिला आहे. या फोटोमध्ये मलायकाचे एब्ससुद्धा दिसून येत आहेत. (हे वाचा: सलमान खानचे 'हे' चित्रपट ठरले होते एकदम फ्लॉप; चाहत्यांनाही बसला होता धक्का) मलायका नेहमीच आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत नात्यात आहे. यामुळे हे दोघेही सतत एकमेकांसोबत दिसून येतात. बऱ्याचवेळा हे दोघेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. बऱ्याच वेळा या कपल्सला लग्नाबद्दल विचारलं जात. मात्र या दोघांनीही यावर कधीही काही स्पष्ट बोललेलं नाहीय. मलायका आज 46 वर्षांची असूनदेखील तितकीच सुंदर आणि फिट आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Malaika arora

  पुढील बातम्या