मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दोन्ही मुलांच्या नावावरून ट्रोल झालीय करीना; असा करते ट्रोलर्सचा सामना

दोन्ही मुलांच्या नावावरून ट्रोल झालीय करीना; असा करते ट्रोलर्सचा सामना

करीना आणि सैफ आपला पहिला मुलगा तैमुरच्यावेळीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

करीना आणि सैफ आपला पहिला मुलगा तैमुरच्यावेळीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

करीना आणि सैफ आपला पहिला मुलगा तैमुरच्यावेळीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

मुंबई, 13 ऑगस्ट- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आपली प्रेग्नेन्सी आणि प्रेग्नेन्सीवर आधारित बुक यामुळे चांगलीच चर्चेत आहे. करीनाने काही महिन्यांपूर्वी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. तिने आपल्या मुलाचं नाव जहांगिर असं ठेवलं आहे. मात्र हे नाव लोकांना चांगलचं खटकलं आहे. तैमुरप्रमाणेचं करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचं नावदेखील काही लोकांना अजिबात रुचलेलं नाहीय. त्यामुळे तैमुरच्यावेळी झालेली गोष्ट पुन्हा एकदा घडत आहे. करीना आणि सैफ जहांगिरच्या नावावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागले आहेत. यासर्व नकारात्मक वातावरणामध्ये करीना स्वतःला कशी सावरते आणि कसं स्वतःला सकारात्मक ठेवते, पाहूया काय म्हणते करीना ...

करीना कपूरने स्वतः म्हटलं आहे, की ‘ ती सध्या या ट्रोलर्सकडे अजिबात लक्ष देत नाही. कारण देशामध्ये कोरोनासारखी भयानक परिस्थिती सुरु आहे. इतकं नकारात्मक वातावरण बनलं आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणे ती टाळते. तसेच माझ्याकडे एकच मार्ग आहे, आणि ते म्हणजे मेडीटेशन. मला लवकरात लवकर मेडीटेशन सुरु करायचं आहे. सर्व नकारात्मक गोष्टी टाळण्यासाठी हाच एक उत्तम मार्ग आहे. मी स्वतः ला भितीकडे ध्क्लेन आणि मेडीटेशन करायला सुरु करेन’.

(हे वाचा:BB OTT: स्वतःला Bisexual घोषित करणाऱ्या मूस जट्टानाचे अतरंगी PHOTO)

तसेच करीनाने पुढं म्हटलं आहे, ‘या जगात दोनच प्रकारच्या गोष्टी घडत असतात. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. मला या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपण जर आनंदी राहिलो, तर सर्व काही सकारात्मक घडेल. आणि त्यामुळेचं आपण आपलं आयुष्य जगू शकेन’. म्हणजेच करीना फक्त सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्यास सांगत आहे. सकारत्मक गोष्टीकडे लक्ष दिल्यास सर्वकाही सकारात्मकचं घडेल.

(हे वाचा:करीनाने नव्या घराच्या गृहप्रवेशाची स्वतः केली होती तयारी; PHOTO होतोय VIRAL  )

करीना आणि सैफ आपला पहिला मुलगा तैमुरच्यावेळीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तैमुरच्या नावरूनसुद्धा खूपच वादविवाद झाले होते. त्यावेळीही लोकांना हे नाव अजिबात पसंत पडलं नव्हत. या कारणामुळे करीना आणि सैफ सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले होते. अभिनेत्री करीना कपूर खानने काही महिन्यांपूर्वी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतरचं सर्वांना त्याच्या नावाची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र करीनाने कोणताही खुलासा केलेला नव्हता. तसेच काही दिवसांपूर्वी करीनाने आपल्या मुलाचं नाव जेह असं सांगितलं होतं. मात्र करीनाचं पुस्तक ‘करीना कपूर खान्स प्रेग्नेन्सी बायबल’मध्ये करीनाने आपल्या मुलाचं नाव जहांगिर असं सांगितलं आहे. हे नाव समोर येताच करीना आणि सैफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

First published:

Tags: Bollywood, Kareena Kapoor