मुंबई, 12 ऑगस्ट- बहुचर्चित बिग बॉस OTTला(Bigg Boss OTT) नुकताच सुरुवात झाली आहे. यामध्ये टीव्हीसह मनोरंजनाच्या विविध माध्यमातील कलाकरांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. शो सुरु होऊन फक्त चार दिवसचं झाले आहेत. मात्र तरीसुद्धा यातील स्पर्धकांमध्ये वादविवाद आणि स्पर्धा पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत आहे. मात्र हे स्पर्धक कोण आहेत आणि त्याचं सोशल मीडियावर काय स्थान आहे? त्यांचे किती फॉलोअर्स (Followers) आहेत यावर एक नजर टाकूया.
View this post on Instagram
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असा रिएलिटी शो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दर्शकांना बिग बॉसच्या नव्या सिझनची उत्सुकता लागली होती. अखेर बिग बॉस आपल्या भेटीला आलं आहे. मात्र यावेळी बिग बॉसचं स्वरूप बदललं आहे. बिग बॉस टीव्हीवर न येता डिजिटल माध्यमावर दाखवण्यात येत आहे. 6 आठवड्यानंतर हा शो टीव्हीवर शिफ्ट केला जाणार आहे. त्यामुळे या शोचं नाव सध्या बिग बॉस OTT असं आहे. करण जोहर होस्ट असणाऱ्या या शोमध्ये सध्या एकूण 13 स्पर्धक आहेत. या स्पर्धकांमध्ये पहिल्या दिवसापासून चढाओढ सुरु झाली आहे.
(हे वाचा: तुम्ही सर्व गाढव आहात'; मुलाच्या नावावरून करीनाला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली स्वरा )
हे स्पर्धक सोशल मीडियावरसुद्धा आहेत फेमस-
बिग बॉस OTTमध्ये सहभागी झालेले स्पर्धक सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा चाहतावर्गसुद्धा तितकाच मोठा आहे. आज आपण पहाणार आहोत या स्पर्धकांचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत. यामध्ये सर्वप्रथम नाव येतं ते गायक मिलिंद गाबाचं, इन्स्टाग्रामवर मिलिंदचे तब्बल 4.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यांनतर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगचा नंबर लागतो, तिचे इन्स्टाग्रामवर 3.3 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. दिव्या अग्रवालचे 2.5, शमिता शेट्टीचेसुद्धा 2.5, रिद्धिमा पंडितचे 1.7 मिलियन, उर्फी जावेदचे 1.4 मिलियन,राकेश बापट 1 मिलियन, नेहा भसीनचे 522 हजार,प्रतिक सहजपालचे 258 हजार, करण नाथ 249 हजार, जीशान खानचे 214 हजार, मूस जटान 184 हजार, निशांत भट्ट 91.3 हजार अशी या असं या स्पर्धकांची सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि फॉलोअर्स आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg Boss OTT, Entertainment