मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BB OTT: शमिता शेट्टीने कोरियोग्राफर निशांत भट्टबद्दल केला धक्कादायक खुलासा

BB OTT: शमिता शेट्टीने कोरियोग्राफर निशांत भट्टबद्दल केला धक्कादायक खुलासा

 Bigg Boss OTT सुरु होऊन अजून एक आठवडाही झालेला नाहीय, मात्र BB हाउसमध्ये विविध विवादांना तोंड फुटत आहे.

Bigg Boss OTT सुरु होऊन अजून एक आठवडाही झालेला नाहीय, मात्र BB हाउसमध्ये विविध विवादांना तोंड फुटत आहे.

Bigg Boss OTT सुरु होऊन अजून एक आठवडाही झालेला नाहीय, मात्र BB हाउसमध्ये विविध विवादांना तोंड फुटत आहे.

  मुंबई, 11ऑगस्ट- Bigg Boss OTT सुरु होऊन अजून एक आठवडाही झालेला नाहीय, मात्र BB हाउसमध्ये विविध विवादांना तोंड फुटत आहे. तसेच अनेक खुलासेही होतं आहेत. शमिता शेट्टीने (Shamita Shetty) बिग बॉसमध्ये कोरियोग्राफर निशांत भट्टबद्दल(Nishant Bhatt) एक धक्कादायक खुलासा केला आहे. शमिताने दिव्या अग्रवालशी बोलताना हा खुलासा केला आहे. पाहूया शमिता नेमकं काय म्हणाली. शमिता शेट्टी बिग बॉस OTTमध्ये सहभागी झाली आहे. तसेच यामध्ये निशांत भट्टसुद्धा आहे. शमिता निशांतला आधीपासूनचं ओळखते. मात्र त्याच्या एका चुकीच्या वागणुकीमुळे ती त्याच्यापासून दूर आहे. शमिता शेट्टी आणि निशांत आत्ता पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. त्यामुळे शमिताला आपल्यासोबत घडलेला प्रकार आठवला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Voot (@voot)

  बिग बॉस OTTच्या घरामध्ये शमिता आणि दिव्या एकमेकांशी बोलत होत्या, यादरम्यान शमिताने निशांतबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. शमिताने दिव्याला सांगितलं की,’एका शो दरम्यान निशांतने माझ्यासोबत आपली मर्यादा ओलांडली होती. त्यामुळे मला खूपच अस्वस्थ वाटलं होतं. म्हणूनचं मी त्याच्यापासून दूर राहते’. (हे वाचा:'शेमलेस निया', युजर्सच्या कमेंट्सवर निया शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली...  ) शमिताने म्हटलं की, ‘मी त्या प्रसंगाबद्दल सांगू शकत नाही. मात्र त्याच्या त्या चुकीच्या वागणुकीमुळे मी खूपच अस्वस्थ झाले होते. मी त्याला म्हटलंदेखील होतं की तू हे चुकीचं केलं आहेस. आणि त्यांनतर आमचं बोलणं बंद झालं होतं. आता मला पुन्हा त्याच्यापासून हे अंतर जपावं लागणार आहे. कारण मी त्या प्रसंगाला पुन्हा आठवू इच्छित नाहीय. त्यामुळे जेव्हा मी त्याला स्टेजवर पाहिलं तेव्हा फक्त असं दाखवलं की मी त्याला फक्त ओळखते’. (हे वाचा:नीना गुप्तांच्या लेकीचा बोल्ड लुक; पाहा मसाबाचे सुपरहॉट PHOTOS  ) निशांत भट्ट एक नामांकित कोरियोग्राफर आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री शमिता शेट्टी यापूर्वी बिग बॉस 3मध्ये दिसून आली होती. मात्र तिने काही खाजगी कारणांमुळे हा शो मधेच सोडला होता. तसेच पहिल्याचं एपिसोडमध्ये निशांत आणि त्याचा पार्टनर बनलेल्या मूसने टास्क जिंकत आपलं सामान मिळवलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Entertainment

  पुढील बातम्या