मुंबई, 24 मे- 'आई कुठे काय करते'
(Aai Kuthe Kay Karate) ही छोट्या पडद्यावरील एक अतिशय लोकप्रिय मालिका आहे.मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतात. त्यामुळेच प्रेक्षक दररोज मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात.सध्या मालिकेत असाच एक रंजक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. पाहूया मालिकेत नेमकं काय घडणार.
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आणि कुटुंबात सतत काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. सुरुवातीला साधीभोळी असणारी अरुंधती आता मालिकेत स्वतःच्या पायावर उभी झाली आहे. सध्या ती मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक निर्णय घेत आहे. ती प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरं जात आहे.
या सर्व बाबतीत तिला तिचा मित्र आशुतोषची मोठी मदत मिळत आहे. सर्वांनाच माहिती आहे की आशुतोष अरुंधतीवर किती प्रेम करतो. आशुतोषला अरुंधतीसोबत आपलं आयुष्य जगायचं आहे. परंतु अरुंधतीने अजूनही आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. दरम्यान आता मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झालेला दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे आता तरी अरुंधती आशुतोषला होकार देणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. मात्र तत्पूर्वी मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
अरुंधती आणि अनिरुद्धच्या घटस्फोटामुळे इतरही कुटुंबियांवर त्याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत ईशा आणि साहिलबाबत. मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्धची लेक असणारी ईशा, साहिलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु अरुंधती आणि अनिरुद्धव्हा घटस्फोटामुळे ईशा आणि साहिल यांच्यात ब्रेकअप झाल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेत पुन्हा कोणतं नवं संकट अरुंधतीसमोर उभं राहणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.