Engineer's Day : बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रिटी ज्यांच्याकडे आहे इंजिनिअरिंगची पदवी

आज 15 सप्टेंबरला इंजिनिअर डे साजरा केला जातो. बॉलिवूडच्या काही सेलिब्रेटींनी शिक्षण तर इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण केलं पण करिअर मात्र अभिनय क्षेत्रात केलं.

  • Share this:

आज 15 सप्टेंबरला इंजिनिअर डे साजरा केला जातो. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी आपलं शिक्षण तर इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण केलं पण करिअर मात्र अभिनय क्षेत्रात केलं.

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जाणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटी मधून मॅकेनिकल इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. या युनिव्हर्सिटीच्या एंटरन्स एग्झामध्ये त्याला 7 वी रँक मिळाली होती.

अभिनेता आर. माधवनला 'रहना है तेरे दिल में' या सिनेमानं विशेष ओळख मिळवून दिली. आज माधवनला त्याच्या अभिनयासाठी ओळखलं जातं पण त्यानंही कोल्हापुरच्या राजाराम कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंगची पदवी घेतली आहे.

अभिनय क्षेत्रीत आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री कृती सेनन अभ्यासात नेहमीच टॉपर राहीली आहे. तिनं जेपी सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नोएडा मधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्सची पदवी घेतली आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यननं 'प्यार का पंचनामा' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. त्यानं मुंबईमधून बायोटेक्नोलॉजीमध्ये इंजीनियरिंगची पदवी घेतली आहे.

बॉलिवूड अभिनेता कादर खान त्यांच्या कॉमेडीसाठी ओळखले जातात मात्र त्यांनीही मुंबईच्या इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्समधून मास्टर्स डिप्लोमा(MIE) केला तसेच सिव्हील इंजिनिअरिंग में स्पेशलायझेशन केलं. याशिवाय ते काही वर्ष प्रोफेसर म्हणूनही काम करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या