Home /News /entertainment /

BREAKING: पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर मनी लाँड्रिंगमध्येही अडकणार राज कुंद्रा, EDने दाखल केला गुन्हा

BREAKING: पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर मनी लाँड्रिंगमध्येही अडकणार राज कुंद्रा, EDने दाखल केला गुन्हा

Money Laundering Case Against Raj Kundra: जवळपास दोन महिने राज कुंद्रा कोठडीत आहे. 19 जुलै 2021 ला राजला अटक करण्यात आली होती.

    मुंबई, 18 सप्टेंबर: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही आहे. पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकलेल्या राज कुंद्राविरोधात आता ईडीने पीएमएलए केस (ED registers PMLA Case against Raj Kundra) दाखल केली आहे. ईडीला राज कुंद्राविरोधात मनी लाँडरिंगचे पुरावे सापडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात (Case registered against Raj Kundra after ED finds evidence of money laundering) आला आहे. पॉर्नोग्राफिक कंटेटच्या (Raj Kundra Pornography Case) विक्रीद्वारे मिळवलेला निधी लंडनमधील एका Llyod बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे. 19 जुलै 2021 ला राजला अटक जवळपास दोन महिने राज कुंद्रा कोठडीत आहे. 19 जुलै 2021 ला राजला अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी प्रकरणात राजसह त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा सुनावनी होणार आहे. 8 सप्टेंबरला राजच्या वकिलांनी कोर्टाकडे पुढची तारीख मागीतली होती. त्यावर आता 16 सप्टेंबरला सुनावनी होणार आहे. हे वाचा- शिल्पाचं स्टेटमेंट आलं समोर, म्हणाली 'मी कामात व्यस्त होते, त्यामुळे..' राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसांची 1500 पानांची चार्जशीट मुंबईच्या न्यायालयीन कोठडीत असलेला राज कुंद्राविरोधात मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai crime Branch) बुधवारी एक चार्जशीट दाखल केली आहे. तर या चार्जशीटमध्ये 43 लोकांची साक्षही नोंदवण्यात आली आहे. त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि शर्लिन चोप्राचाही (Sherlyn Chopra) समावेश आहे. दरम्यान 1500 पानांची ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात असलेला राज कुंद्रा आणि अन्य काही लोक यांच्याविरोधात ही चार्जशीट बनवण्यात आली आहे.<
    First published:

    Tags: Raj kundra, Shilpa shetty

    पुढील बातम्या