अनन्या पांडेनंतर एनर्जेटिक शनायाच्या अनोख्या डान्स अदा VIRAL; पाहा हा धमाल VIDEO
स्टार किड्स सिनेमात येण्याआधीपासूनच चर्चेत असतात. अनन्या पांडेनंतर आता चर्चा आहे शनाया कपूरची. सोशल मीडियावर संजय कपूर कन्येचा जलवा दिसू लागला आहे. पाहा हा VIDEO, तिच्या आईनेच शेअर केला आहे.
मुंबई, 13 जानेवारी : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता संजय कपूर (Actor Sanjay Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) हीसुद्धा सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय असते. तिनं आपलं इन्स्टा अकाउंट (Insta account) प्रायव्हेट ठेवलं आहे. मात्र तरीही तिचे फोटोज (photos) आणि व्हीडिओज (videos) सतत ट्रेंड करत असतात.
पार्टीमधल्या तिच्या बोल्ड अदांपासून ते अनन्या पांडेसोबतच्या (Ananya Pandey) मस्तीपर्यंत तिची सगळीच रूपं चाहत्यांना मोहात पाडतात. आता सध्याही शनायाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर (social media) ट्रेंड करतो आहे.
या व्हायरल व्हीडिओमध्ये (viral video) शनाया एका इंग्रजी गाण्यावर कमालीच्या सुरेख शैलीत डान्स करते आहे. ती आपल्या कोरियोग्राफरसह (choreographer) या गाण्यावर ताल धरताना दिसते. या व्हीडिओला पासून सगळेच चाहते इम्प्रेस झाल्याचे दिसत होते. जान्हवी कपूरपासून ते बॉलिवूडचे (Bollywood) इतर सेलेब्ससुदधा शनायाचं कौतुक करताना थकत नाहीत. तिचं नृत्यकौशल्य पाहता सगळेच तिला बॉलिवूडसाठी एकदम 'रेडी मटेरियल' असल्याचं सर्टिफिकेट देत आहेत.
तसं पाहता या व्हीडिओला शनायाच्या आई महीप यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्या आपल्या मुलीच्या डान्सचं (Dance) कौतुक करत आहेतच पण सोबतच त्या या सगळ्याचं श्रेय स्वतःलाही देतात.
व्हीडिओ शेअर करताना महीप लिहितात, 'तिला ही कौशल्यं आपल्या आईकडूनच मिळालीत. आता महीप यांनी असं कॅप्शन दिलं असल्यानं काही चाहत्यांनी महीप यांनीही डान्स करून दाखवावा अशी प्रेमळ मागणी केली आहे. शनायाच्या आधी जान्हवी कपूरच्या डान्सनंही सोशल मीडियावर धमाल केली होती. तिनं कमालीचा अनोखा बेली डान्स करून अनेकांची मनं मोहून घेतली. जान्हवीचाही तो व्हीडिओ ट्रेंड करतोच आहे.