KBC मध्ये जिंकले 1 कोटी, आता निवडणूक आयोगाने केलं अ‍ॅम्बेसिडर

अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोमधून त्यांना देशभरात ओळख मिळाली. या शोमध्ये सप्टेंबर महिन्यात त्यांनी एक कोटी रुपये जिंकले होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 03:29 PM IST

KBC मध्ये जिंकले 1 कोटी, आता निवडणूक आयोगाने केलं अ‍ॅम्बेसिडर

मुंबई, 02 ऑक्टोबर- कौन बनेगा करोडपती या गेम शोमध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या बबिता तांडे यांना आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचं अ‍ॅम्बेसिडर केलं आहे. आयोगाच्या पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग या कार्यक्रमाअंतर्गत बबीता त्यांच्या जिल्ह्यातील घरा-घरात जाऊन लोकांना मतदानाचं महत्त्व सांगून मतदान करण्यासही सांगतील. याबद्दल अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनाक्षी खरी यांनी माहिती दिली.

हे आपलं कर्तव्य आहे-

दरम्यान, बबीता म्हणाल्या की, सर्वांनीच मतदान केलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. मी जास्तीत जास्त लोकांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करेन. त्यातही ग्रामीण भागात लोकांना मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडत मतदान करण्याबद्दल सांगेन.

मिनाक्षी म्हणाल्या की, जिल्हा प्रशासनाने लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. पहिल्यांदा मतदान करणारे, दिव्यांग, वृद्ध आणि महिलांसाठी अनेक सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणूकीत कमी होता अशा गटाकडे यंदा प्रशासन विशेष लक्ष देत आहे.

कौन बनेगा करोडपतीमधून मिळाली ओळख-

Loading...

अमरावती जिल्ह्यातील अंजानगांव सुरजी येथील राहणाऱ्या बबीता या सरकारी शाळेत मुलांसाठी स्वयंपाक करण्याचं काम करायच्या. त्यांना अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोमधून ओळख मिळाली. या शोमध्ये सप्टेंबर महिन्यात त्यांनी एक कोटी रुपये जिंकले होते.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...