मुंबई, 7 मे- एकता कपूरचा
(Ekta Kapoor) बहुचर्चित 'लॉकअप
' (LockUpp) हा रिअॅलिटी शो सध्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. आज शोचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. शोच्या शेवटच्या भागापूर्वीच 'बिग बॉस 15'
(Bigg Boss 15 Winner) ची विजेती ठरलेली तेजस्वी प्रकाश
(Tejasswi Prakash) या शोमध्ये सहभागी झाली आहे. 'लॉक अप'मध्ये ती तिचा बॉयफ्रेंड बाबी अभिनेता करण कुंद्रासोबत
(Karan Kundra) जेल वॉर्डन बनली आहे. या शोमध्ये करण जेलरची भूमिका साकारत आहे. या शोमध्ये येण्यासाठी तेजस्वी प्रकाशला अफाट मानधन देण्यात आलं आहे. तिचं मानधन अगदी करण इतकंच आहे.
तेजस्वी प्रकाशने फक्त शेवटच्या 2-3 भागांसाठी शोमध्ये एन्ट्री घेतली आहे. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, तेजस्वीला तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा इतकंच मानधन देण्यात आलं आहे. या एपिसोडसाठी तेजस्वीला 2 ते 3 लाख रुपये मिळाले आहेत. हे केवळ रोजच्या भागासाठी असले तरी, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच तेजस्वी फिनाले एपिसोडमध्ये सहभागी होणार की नाही हे अजूनही कन्फर्म झालेलं नाहीय.
लॉकअपच्या आगामी भागाचा प्रोमो Alt बालाजीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये शोचा जेलर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश शोची स्पेशल क्वीन वॉर्डन आहे. क्वीन वॉर्डन असल्याने तेजस्वीला एक विशेष पॉवरदेखील देण्यात आली आहे. ज्याला क्वीन कार्ड असं म्हटलं जात आहे. ही पॉवर ती शोमध्ये कधीही वापरू शकते.
निर्मात्यांनी हा प्रोमो व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत लिहिलंय, "या जेलर-वॉर्डन्सची केमिस्ट्री पाहिली पाहिजे. लॉकअपचा शेवट पाहा." त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलंय, “गेल्या अत्याचारी आठवड्यात मोठा ट्विस्ट. खडूस जेलर भेटणार आहे. सोबतच खतरनाक वॉर्डन. एपिसोड अजिबात चुकवू नका. हॅशटॅग तेजरन फेम". वास्तविक तेजस्वी आणि करण बिग बॉसच्या घरात एकेमकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.