Home /News /entertainment /

अखेर एकता कपूरच्या Alt बालाजीने हटवलं समलैंगिक सीरिजचं पोस्टर

अखेर एकता कपूरच्या Alt बालाजीने हटवलं समलैंगिक सीरिजचं पोस्टर

Alt बालाजीच्या (Alt Balaji production) ‘हिझ स्टोरी’ (His story) या समलैंगिक वेबसीरिजचं (same sex webseries) पोस्टर आता निर्मात्यांनी हटवलं आहे.

    मुंबई, 11 एप्रिल : निर्माती एकता कपूरच्या (Ekta Kapoor) नव्या वेबसीरिज वरून एक वाद पेटला होता. पण आता त्यावर पडदा पडत असल्याचं दिसत आहे. Alt बालाजीच्या (Alt Balaji production) ‘हिझ स्टोरी’ (His story) या समलैंगिक वेबसीरिजचं (same sex webseries) पोस्टर आता निर्मात्यांनी हटवलं आहे. नुकताच या सीरिजच्या पोस्टर वरून वाद रंगला होता. पोस्टर चोरीचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला होता. (वाचा - जेव्हा ‘काशीबाई’ला 'मस्तानी'च्या रोलबद्दल विचारलं जात; पाहा प्रियंका चोप्राने काय दिलं उत्तर) काय होता वाद? या पोस्टर मध्ये एक समलैंगिक कपल बेड वर झोपलं आहे. त्यात अभिनेता मृणाल दत्त (Mrunal Dutt) आणि सत्यजीत मिश्रा (Satyajit Mishra) आहेत. पण हे पोस्टर आल्यानंतर 2015 मध्ये आलेला चित्रपट LOEV चे आर्ट दिग्दर्शक आणि फिल्म मार्केटींग स्ट्रॅटेजिस्ट जहान बक्षी (Jahan bakshi) ने यावर साहित्यिक चोरी (Plagiarism) चा आरोप लावला आहे. याविषयी ट्विट करत त्यांनी हे भाष्य केलं होतं. तर पोस्टर सोबतच चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी केला होता. त्यानंतर आता Alt बालाजीने यावर हालचाली करत तातडीने पोस्टर हटवलं आहे. त्यानंतर त्यांनी एक पोस्ट लिहून या संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यात त्यांनी LOEV चित्रपटाचे दिग्दर्शक सुधांशू सरिहा यांनाही टॅग केलं आहे. त्यांनीही यावर ट्विटरद्वारे भाष्य केलं होतं. आपल्या टिमला या पोस्टर विषयी माहिती नव्हती. ती त्यांची चूकच आहे व आपण त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो. आमचं पोस्टर मागे घेतो असं म्हटलं आहे. त्यानंतर या प्रकरणात दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनीही उडी घेतली आणि LOEV चित्रपटाचे दिग्दर्शक सुधांशू सरिहा यांची पाठराखण केली. त्यांनी त्यांच्या इंन्स्टाग्रामवरून सुधांशू सरिहा यांची बाजू मांडली
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या