एकता कपूरची समलैंगिकांवरची नवी वेबसीरिज प्रदर्शनत व्हायच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात, या पोस्टरवरून सुरू झाला वाद

एकता कपूरची समलैंगिकांवरची नवी वेबसीरिज प्रदर्शनत व्हायच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात, या पोस्टरवरून सुरू झाला वाद

एकता कपूरची (Ekta Kapoor) नवी वेबसीरिज प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका समलैंगिक जोडप्याची ही गोष्ट आहे.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल – प्रसिद्ध निर्माती आणि Alt बालाजी (ALT Balaji production house) या प्रोडक्शन हाऊसची सर्वेसर्वा  एकता कपूरची (Ekta Kapoor) नवी वेबसीरिज प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजचं एक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. आणि त्यानंतर वाद सुरू झाला. एका समलैंगिक जोडप्याची ही गोष्ट आहे. तर त्यालाचं अनुसरून पोस्टर बनवण्यात आलं आहे. पण या पोस्टर वर चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. ‘हिज स्टोरी’ (His story) असं या वेबसीरिजचं नाव आहे.

या पोस्टर मध्ये एक समलैंगिक कपल बेड वर झोपलं आहे. त्यात अभिनेता मृणाल दत्त (Mrunal Dutt) आणि सत्यजीत मिश्रा (Satyajit Mishra) आहेत. पण हे पोस्टर आल्यानंतर 2015 मध्ये आलेला चित्रपट LOEV चे आर्ट दिग्दर्शक आणि  फिल्म मार्केटींग स्ट्रॅटेजिस्ट जहान बक्षी (Jahan bakshi)  ने यावर साहित्यिक चोरी (Plagiarism) चा आरोप लावला आहे. याविषयी ट्विट करत त्यांनी हे भाष्य केलं आहे.

कपिल शर्मा कसा झाला कॉमेडी किंग?; विनोदवीराचा संघर्ष आता शालेय पुस्तकात

याशिवाय फक्त पोस्टरच नव्हे तर कथा देखिल सारखीच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोन्ही चित्रपट हे समलैंगिक नात्यावर आधारीत आहेत. त्यानंतर LOEV चित्रपटाचे दिग्दर्शक सुधांशू  सरिआ यांनीही ट्वीट केलं आहे. Alt बालाजी या एकता कपूरच्या प्रोडक्शन ची त्यांनी निंदा केली आहे.आम्ही विना फंड हे पोस्टर आणि चित्रपट बनवला होता पण एकता कपूरचं  Alt बालाजीचं मोठं नाव असूनही नवं पोस्टर बनवू शकर नाही असां सवाल त्यांनी केला आहे.

या आधीही एकता कपूरच्या काही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या तर आता हि नवी बेवसीरिज हिज स्टोरी सुद्धा पोस्टर मुळे अडचनीत आली आहे. तेव्हा आता या सीरीजचं पोस्टर बदललं जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Published by: News Digital
First published: April 10, 2021, 7:54 PM IST

ताज्या बातम्या