3 वर्षांपूर्वी आई बनली होती एकता कपूर, चाहत्यांपासून लपवलं होतं 'हे' गुपित

43 वर्षीय एकता कपूर 27 जानेवारीला सरोगेसीद्वारे आई बनली.

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 04:56 PM IST

3 वर्षांपूर्वी आई बनली होती एकता कपूर, चाहत्यांपासून लपवलं होतं 'हे' गुपित

मुंबई, 12 मे : आज मदर्स डेला प्रत्येकजण आपल्या आईसोबतच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. कतरीना पासून ते आलिया पर्यंत सर्वांनीच आपल्या आईसोबत बालपणीचे फोटो शेअर केले. पण प्रसिद्ध टीव्ही निर्माती एकदा कपूरनं मात्र एकदम हटके स्टाइलनं मदर्स डे साजरा केला. तिनंही सोशल मीडियावर फोटो शेअर केला मात्र हा फोटो तिच्या आईसोबतचा नाही आहे.

एकता कपूरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती आपल्या आईसोबत नाही तर आपल्या मुलासोबत दिसत आहे. तिच्या मुलाचा चेहरा मात्र या फोटोमध्ये दिसत नाही आहे. या फोटोला एकतानं दिलेलं कॅप्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. एकतानं लिहिलं, 'एक आई म्हणून हा माझा पहिला मदर्स डे... नाही. खरंतर मी 3 वर्षांपूर्वीच आई बनले आहे.' एकताच्या या कॅप्शनमुळे तिचे चाहते कन्फ्युज झाले आहेत. कारण एकता काही महिन्यांपूर्वीच आई बनली आहे. मग ती  3 वर्षांपूर्वी आई कशी काय बनू शकते असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Loading...

 

View this post on Instagram
 

First Mother’s Day as a mother naaaaah that was three years ago! #motheroftwo


A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

एकताच्या बाळाच्या आधी तिचा भाऊ तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य 3 वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात आला आहे. नात्यानं जरी एकता लक्ष्यची आत्या असली तरीही त्यांच्यातील नातं आई-लेकापेक्षा कमी नाही. त्यामुळे या फोटोमध्ये एकताच्या बाळासोबतच लक्ष्य सुद्धा दिसत आहे आणि एकता लक्ष्यबद्दलच बोलत आहे.

न्यूयॉर्कला जाऊन ऋषी कपूरना भेटली रणबीरची 'ही' एक्स गर्लफ्रेंड
 

View this post on Instagram
 

Maaasi love !!


A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

VIDEO : गणेश गायतोंडेपेक्षा कमी नव्हता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या खऱ्या आयुष्यातील संघर्ष

43 वर्षीय एकता कपूर 27 जानेवारीला सरोगेसीद्वारे आई बनली. तुषारच्या मुलाचा जन्म सुद्धा सरेगेसीद्वारेच झाला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून सरोगेसीच्या माध्यमातून आई बनण्याचा विचार करत होती. मात्र त्यासाठी तिच्या मनाची तयारी किती दिवसांपासून होत नव्हती. अनेकदा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तिनं सरोगेसीद्वारे आई बनण्याचा निर्णय घेतला.

1.5 कोटींचं फक्त जिम, शाहरुख- अमिताभ यांच्यापेक्षाही दुप्पट महाग गाडी वापरतो हा सुपरस्टार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...