...जेव्हा स्मृती इराणी यांनी मिस इंडिया स्पर्धेत घेतला होता भाग, पाहा थ्रोबॅक VIDEO

...जेव्हा स्मृती इराणी यांनी मिस इंडिया स्पर्धेत घेतला होता भाग, पाहा थ्रोबॅक VIDEO

हा व्हिडीओ त्या वेळीचा आहे. जेव्हा स्मृती इराणी यांनी 1998 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.

  • Share this:

मुंबई, 27 जून : टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखली जाणाऱ्या एकता कपूरनं तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर केंद्रीय मंत्री आणि तिची खास मैत्रीण स्मृती इराणी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्या वेळीचा आहे. जेव्हा स्मृती इराणी यांनी 1998 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी त्यांच्या हॉबीज बद्दल बोलताना दिसत आहेत. त्या रॅम्पवॉक सुद्धा करत आहेत. त्यांनी जेव्हा मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता त्यावेळी त्या केवळ 21 वर्षांच्या होत्या. हा किताब तर त्या जिंकू शकल्या नाहीत. पण इथून त्यांच्या करिअरची सुरुवात मात्र झाली होती. या स्पर्धेनंतर त्यांना एकता कपूरची 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही मालिका मिळली आणि त्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या.

सुशांतलाही मिळाली होती Fairness cream ची जाहिरात; धुडकावली कोट्यवधींची ऑफर

View this post on Instagram

Appreciation Post for my friend Smriti Irani who started off not winning Miss India but went on to become a household name. This is for people who think that success comes easy...it is tough, it is hard but it comes to all those who work hard. Smriti became a household name, today is a minister. Her whole persona has changed into a powerful yet humble politician. But when she started off, she was a meek, shy, simple girl who had walked into Balaji...and we knew her smile would win hearts. Recently, a colleague of hers, who hasn't worked with her, called her up for help, she immediately helped that person. That shows, even today she maintains relations with people who were working with her once. This humility and this attachment to her roots, makes her a fantastic person. So proud of you my friend! @smritiiraniofficial

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor) on

हा व्हिडीओ करताना एकता कपूरनं स्मृती इराणी यांचं कौतुक केलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये एकतानं लिहिलं, ही पोस्ट खास माझी मैत्रीण स्मृती इराणी यांच्यासाठी आहे. ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मिस इंडिया कॉम्पिटीशनमध्ये भाग घेत केली होती. हा किताब त्यांना मिळाला नसला तरी त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

प्रसूनजी आपने सीन गलत समझा! मुलींच्या Sexualizationच्या आरोपाला स्वराचं उत्तर

एकतानं तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, 'ही पोस्ट त्या लोकांसाठी आहे. ज्यांना वाटतं की, सक्सेस खूप सहज मिळतं. पण हे यश मिळवणं खूप कठीण आहे. पण ते यश त्या लोकांना नक्कीच मिळतं जे त्याच्यासाठी खूप मेहनत घेतात. स्मृती इराणींना आज सर्वजण ओळखतात. आज त्या मिनिस्टर आहेत. त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा खूप बदलली आहे. त्या पॉवरफुल आणि एक नम्र राजकीय व्यक्ती आहेत.' स्मृती इराणी आणि एकता कपूर यांची मैत्री तर सर्वांना माहित आहे. एकता अनेकदा त्यांच्यासोबतचे जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

First published: June 27, 2020, 10:12 AM IST

ताज्या बातम्या