मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

45 वर्षाची एकता कपूर करणार लग्न? 'मिस्ट्री मॅन'सोबतचा PHOTO व्हायरल

45 वर्षाची एकता कपूर करणार लग्न? 'मिस्ट्री मॅन'सोबतचा PHOTO व्हायरल

छोट्या पडद्यावर अनेक लग्नाचे सिक्वेन्स रंगवणारी एकता कपूर (Ekta Kapoor) आता स्वत: लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

छोट्या पडद्यावर अनेक लग्नाचे सिक्वेन्स रंगवणारी एकता कपूर (Ekta Kapoor) आता स्वत: लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

छोट्या पडद्यावर अनेक लग्नाचे सिक्वेन्स रंगवणारी एकता कपूर (Ekta Kapoor) आता स्वत: लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 16 डिसेंबर: टीव्ही सीरिअलची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर (Ekta Kapoor) नेहमी तिच्या कामामुळे चर्चेत असते पण सध्या तिचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. एकता कपूर लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकताने स्वत: सोशल मीडियावर एका हँडसम तरुणाचा फोटो शेअर केला आहे त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोवर कॅप्शन दिलं आहे, '… आणि आम्ही इथे आहोत लवकरच तुम्हाला सांगू' एकता कपूर 45 वर्षाची आहे. ती एका मुलाची आईदेखील आहे. एकताने सरोगसीतून या मुलाला जन्म दिला होता. एकताने ज्या तरुणाचा फोटो शेअर केला आहे त्याचं नाव तनवीर बुकवाला (Tanveer Bookwala) असं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकता आणि त्याची चांगली मैत्री आहे. एकताच्या या फोटोवर तनवीरनेही कॉमेंट केली आहे. त्यानं लिहीलं आहे, ‘आता या मैत्रीचं रुपांतर नात्यात करण्याची वेळ आली आहे.’
View this post on Instagram

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

वयाच्या 19 व्या वर्षी एकताने आपल्या टीव्ही क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. विद्या बालन, सुशांत सिंह राजपूत अशा बड्या कलाकारांना एकेकाळी एकतानेच ब्रेक दिला होता. सास-बहू किंवा एक्स्ट्रा मॅरिटीअल अफेअर ही कॉन्सेप्ट एकतानेच सर्वप्रथम छोट्या पडद्यावर आणली. राजेशाही थाट, मोठे सेट, गाड्या, बंगले, अगदी घरातही दागदागिने घालून फिरणाऱ्या महिला कलाकार हे दृश्य एकता कपूरच्या मालिकांमध्येच सर्वात आधी दाखवण्यात आलं. मेलोड्रामा, भरपूर मसाला असणाऱ्या एकताच्या जवळजवळ सगळ्याच मालिका हिट झाल्या आहेत. छोट्या पडद्यावरील अनेकांची करिअर एकता कपूरने घडवली आहेत.
First published:

Tags: Instagram, TV serials, Wedding

पुढील बातम्या