Home /News /entertainment /

एकता कपूरचा झाला ब्रेकअप? म्हणाली 'तुम्हाला रुची असेल तर..... '

एकता कपूरचा झाला ब्रेकअप? म्हणाली 'तुम्हाला रुची असेल तर..... '

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची लेक आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका एकता कपूर नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते.

    मुंबई, 19 जानेवारी-   टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर   (Ekta Kapoor)  आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या तिची इन्स्टाग्राम पोस्ट    (Instagram Post)   मोठ्या चर्चेत आली आहे. या पोस्टवरून सर्वांना एकता कपूरचा ब्रेकअप झाल्याचं वाटत आहे. एकताने अतरंगी अंदाजात आपल्या ब्रेकअपची बातमीसुद्धा चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. पाहा काय आहे एकताची नेमकी पोस्ट.. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची लेक आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका एकता कपूर नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते. टीव्ही मालिकांमध्ये तिचा वट कायम आहे. अभिनेत्री एकापेक्षा एक हटके विषय प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. नुकताच तिने प्रेक्षकांना सोशल मीडियावरून आपल्या 'नागिन ६' या मालिकेच्या स्टार कास्टबद्दल सल्ला मागितला होता. सध्या एकता आपल्या या मालिकेसाठी कास्ट शोधत आहे. त्यांनतर आता एकताने आणखी एक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काय आहे पोस्ट- एकता कपूरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत लिहिलं आहे, 'मी सध्या डेट करत नाहीय. तुम्हाला माझ्यात रुची असेल, तर तुम्ही मला 'माझा वेळ कसा वाया नाही घालवणार' यावर पाचशे शब्दांचा निबंध लिहून देऊ शकता. यावरून एकताचा ब्रेकअप झाला की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. इतकंच इतकंच नव्हे तर एकता कपूरने आणखी एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे, 'मला हाय मेंटेनन्समध्ये राहणं पसंत आहे. कारण मलाच तर सगळं मेंटेन करायचं आहे'. टीव्ही क्वीन एकता कपूरच्या या हटके पोस्ट पाहून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच एकता कपूरने इन्स्टाग्रामवर आपल्या गर्ल गॅंगसोबतचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. यामध्ये ती चील करताना दिसून येत आहे. आणखी सांगायचं झालं तर एकता कपूर सरोगसीद्वारे एका मुलाची आई बनली आहे. ती सतत आपल्या मुलासोबत मजामस्ती करताना दिसून येते.तसेच काही दिवसांपूर्वी एकता कपूर आणि लेखक तन्वीर बुकवाला यांचा एक फोटो समोर आला होता. त्यांच्यामध्ये जवळीकता असल्याचं म्हटलं जात होतं. तन्वीर हा डिंग एन्टरटेनमेन्टचा संस्थापकसुद्धा आहे. परंतु आता एकताची अशी पोस्ट पाहून निरनिराळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Ekta kapoor, Entertainment

    पुढील बातम्या