मुंबई, 9 सप्टेंबर : हिंदी मालिकांवर राज्य करणारी निर्माती एकता कपूर सध्या बेव सीरिजमुळे चर्चेत आहे. अलिकडेच ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजमधील एका दृष्यामुळे तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तिला लोकांच्या टीकांना सामोरे जावे लागले आहे.
एकता कपूरची ‘व्हर्जिन भास्कर २’ नावाची एक नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सीरिजमध्ये एका हॉस्टेलमध्ये काही बेकायदेशीर कामे केली जात असल्याचं दाखविण्यात आलं आहे. या हॉस्टेलचं नाव ‘अहिल्याबाई होळकर’ असं ठेवलं आहे. या नावामुळे प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 40 ते 50 जणांच्या जमावाने एकताच्या बंगल्याभोवती निदर्शनं केली. तिच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनी प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहून ‘व्हर्जिन भास्कर 2’ मधील तो सीन हटवण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बदललं नशीब; इंजिनिअर महिन्याला कमावतोय लाखो रुपये
अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या. त्यांनी प्रजेसाठी अनेक कामे केली. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे आजही लोक त्यांचे नाव घेतात. इतक्या मोठ्या व्यक्तीचं नाव अशा प्रकारे वापरणे चुकीचे असल्याची भावना या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एकता कपूरने या बाबात लेखी माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वेब सीरिजमधील तो भाग वगळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती सांगण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.