VIDEO : एकता कपूरच्या ‘फिक्सर’ सेटवर राडा, कलाकारांना मारहाण

ekta kapoor तिग्माशू यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ एकता कपूरनंही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 10:29 PM IST

VIDEO : एकता कपूरच्या ‘फिक्सर’ सेटवर राडा, कलाकारांना मारहाण

मुंबई, 19 जून : निर्माती एकता कपूरचं ओटीटी (Over The Top Media service) चॅनेल 'अल्ट बालाजी'च्या बॅनरखाली सुरु असलेल्या ‘फिक्सर’ या शोच्या कलाकारांसह क्रू मेंबरना मारहाण केल्याची घटना आज मीरा रोड घोडबंदर रोड येथे घडली. या घटनेनंतर या शोचे दिग्दर्शक तिग्माशू धुलिया यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या या प्रकाराची माहिती त्याच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दिली. या मारहाणीमध्ये या शोची अभिनेत्री माही गिल आणि निर्माता साकेत सावनी यांनाही दुखापत झाली असून अद्याप याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

गौतम बुद्धांच्या मूर्तीवर बसून फोटो काढल्यानं आयुष्यमान खुरानाच्या पत्नीवर टीका

दिग्दर्शक तिग्माशू धुलिया यांनी या व्हिडिओमध्ये त्यांच्या सोबत घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला आहे. ते सांगतात, ‘आम्ही मीरा रोड घोडबंदर रोड येथील एका फॅक्टरीमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून शूट करत आहोत. या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी आम्ही कायदेशीर परवानगी घेतली असून त्यासाठीचे रक्कमही संबंधीत फॅक्टरीला दिलेली आहे. मात्र संध्याकाळी 4.30च्या सुमारास चार व्यक्ती मद्यपान करून आमच्या लोकेशनवर आल्या आणि त्यांनी सर्वांना मारायला सुरुवात केली एवढंच नाही तर या ठिकणी असलेल्या महिला क्रू मेंबरनाही मारहाण केली. यात अभिनेत्री माही गिल, निर्माता साकेत सावनी यांच्यासह क्रू मेंबरना दुखापत झाली.’या व्हिडिओच्या शेवटी तिग्माशू यांनी या बाबत पोलिसांकडे कोणताही तक्रार न केल्याचं स्पष्ट केलं आणि या सोबतच असं न करण्याचं कारणही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ज्यावेळी आम्हाला मारहाण होत होती तेव्हा काही पोलिस त्याठिकाणी हजर होते मात्र त्यांनी आम्हाला मदत करण्याऐवजी त्या चार व्यक्तींना आम्हाला मारण्यास सांगितलं. आम्ही त्यांच्याकडे मदत मागितली त्यावर ते म्हणाले की आम्ही कंपाउंडमध्ये येतो. आत आल्यावर त्यांनी गेट बंद केला. आम्हाला आमचं सामानही बाहेर काढू दिलं नाही. ते आम्हाला म्हणाले, तुम्ही पोलिस स्टेशनला या तिथे तक्रार लिहा पैसे भरा त्यानंतर तुम्हाला तुमचं सामान मिळेल.’ अभिनेत्री माही गिल म्हणाली, ‘हा प्रकार अचानक घडला, मलाही दुखापत झाली पण मी गाडीत जाऊन बसले मात्र तिथून मी पाहिलं तर ते लोक सर्वांना जनावरांसारखं मारत होते. पोलिसांनीही आम्हाला मदत केली नाही उलट त्या गुंडांना आम्हाला मारायला प्रोत्साहन दिलं.

रोशन कुटुंबीयांच्या वादात नवा ट्विस्ट, कंगनाच्या बहिणीचा हृतिकवर गंभीर आरोप
 

View this post on Instagram
 

V v sad ! Violence on sets of #fixer


A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

तिग्माशू यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ एकता कपूरनंही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तिग्माशू यांच्या ट्वीटवर मुंबई पोलिसांनीही रिप्लाय केला असून आम्ही याबाबतची माहिती ठाणे पोलिसांना दिली असून ते तुम्हाला मदत करतील असं मुंबई पोलिसांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कपड्यांमुळे प्रियांकाच्या चोप्रा झाली ट्रोल, नेटकरी म्हणतात हा तर RSS स्वॅग
===================================================================

VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...