‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाच्या चार निर्मात्यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाच्या चार निर्मात्यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या सिनेमाविरुद्ध आवाज उठवला आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च- निवडणुक आयोगाने बुधवारी पीएम नरेंद्र मोदी सिनेमाच्या चार निर्मात्यांना नोटीस पाठवली. निवडणुक आयोगाने ही नोटीस काँग्रेस आणि सीपीआयने केलेल्या तक्रारीनंतर पाठवली. काँग्रेस आणि सीपीएमने केलेल्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटलं की, हा सिनेमा राजकीय हेतूने तयार करण्त आला आहे. यासोबत निवडणुक आयोगाने दोन वृत्तपत्रांनाही नोटीस पाठवली आहे. या वृत्तपत्रांमध्ये सिनेमाचं पोस्टर छापण्यात आलं होतं. सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुक आयोगची भेट घेत सिनेमाबद्दल अधिकृत तक्रार नोंदवली. दोन्ही पक्षांनी आरोप केला होता की, या सिनेमाच्या माध्यमातून भाजप निवडणुकीत फायदा घेण्याच्या विचारात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले की, हा सिनेमा म्हणजे संविधानाचं उल्लंघन आहे. या सिनेमाचा हेतू पक्षाला निवडणुकीत फायदा मिळवून देणं हाच असल्याचं आम्ही निवडणुक आयोगाला सांगितलं. या सिनेमाचे तीन निर्माते भाजप पक्षाशी जोडलेले आहेत. सिनेमाचा अभिनेताही भाजपचाच आहे. तर सिनेमाचा दिग्दर्शक वायब्रंट गुजरात ग्लोबल समिटशी जोडला गेला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या सिनेमाविरुद्ध आवाज उठवला आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनेही हा सिनेमा आचार संहितेच्या विरोधात असल्यामुळे महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचं सांगितलं.

पंतप्रधान मोदींचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमात विवेक ओबेरॉयने मोदींची व्यक्तिरेखा साकारली आहे. अनेकांना विवेकने साकारलेले मोदी फारसे पटले नाहीत. सोशल मीडियावर पहिल्या दिवसापासून सिनेमाच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्ष कशाप्रकारे विवेकला स्वीकारतात ते पाहणं उत्सुकतेचं असेल.

VIDEO स्कूटर अपघात पाहून राहुल गांधींनी थांबवला ताफा; जखमी पत्रकाराला स्वतःच्या कारमधून नेलं रुग्णालयात

First published: March 27, 2019, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading