मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शूटिंगवर जायला झाला होता उशीर; वैतागलेल्या 'Rock'नं हातांनी तोडला लोखंडी गेट 

शूटिंगवर जायला झाला होता उशीर; वैतागलेल्या 'Rock'नं हातांनी तोडला लोखंडी गेट 

चित्रपटाच्या निमित्तानं त्याला अशीच एक संधी मिळाली. अन् त्यानं देखील घरातील लोखंड गेट हातांनी तोडून त्या संधीचं सोनं केलं. पाहा हा थक्क करणारा व्हिडीओ...

  मुंबई 2 मे: ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अभिनयसृष्टीत येण्यापूर्वी तो रेसलिंग करायचा. WWE मध्ये त्याला द रॉक म्हणून ओळखलं जायंच. काही वर्षांपूर्वी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यानं WWE मधून निवृत्ती घेतली. परंतु तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल शक्ती प्रदर्शन करण्याची त्याची हौस काही अद्याप गेलेली नाही. अलिकडेच चित्रपटाच्या निमित्तानं त्याला अशीच एक संधी मिळाली. अन् त्यानं देखील घरातील लोखंड गेट हातांनी तोडून त्या संधीचं सोनं केलं. पाहा हा थक्क करणारा व्हिडीओ... ड्वेन जॉन्सन उर्फ द रॉक सध्या ‘ब्लॅक अॅडम’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ड्वेन एका सुपरहिरोची भूमिका साकारत आहे. चित्रपटात दैवी शक्तीचा मालक असलेला रॉक मोठमोठ्या गाड्या, झाडं अगदी इमारती देखील चुटकसरशी उचलतो. परंतु रुपेरी पडद्यावर सुपरहिरो साकारणारा ड्वेन खऱ्या आयुष्यातही सुपरहिरोपेक्षा कमी नाही. अन् याचा प्रत्यय नुकताच आला. त्या घटनेमुळं Rock करणार होता आत्महत्या; WWEमुळं वाचले अभिनेत्याचे प्राण
  View this post on Instagram

  A post shared by therock (@therock)

  चित्रपटाच्या शूटिंगवर जाण्यासाठी ड्वेनला उशीर होत होता. त्याच्या घराबाहेरी कुंपणाचा गेट रिमोर्टवर चालतो. परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. अखेर संतापलेल्या रॉकने हातांनीच त्या गेटला तोडून टाकलं. त्याचं हे कृत्य त्याच्या मुलांनी कॅमेरात कैद केलं. अन् पाहा आमच्या वडिलांनी ताकत असं म्हणत सोशल मीडियावर शेअर केलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. रॉकची ताकत पाहून चाहते भारावून गेले आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Shocking viral video

  पुढील बातम्या