Home /News /entertainment /

त्या घटनेमुळं Rock करणार होता आत्महत्या; WWEमुळं वाचले अभिनेत्याचे प्राण

त्या घटनेमुळं Rock करणार होता आत्महत्या; WWEमुळं वाचले अभिनेत्याचे प्राण

HBD: डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी ड्वेन जॉन्सन खेळत होता WWE; पाहा कसा झाला जगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

    मुंबई 2 मे: ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आज ड्वेनचा वाढदिवस आहे. 49व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज ड्वेन जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज यशाचा शिखरावर असलेला रॉक (Rock) कधीकाळी डिप्रेशनमुळं आत्महत्या करणार होता. परंतु WWE मुळं त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं, आज आज जगभरातील तरुण त्याला आपला आदर्श मानतात. अभिनयसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ड्वेनला ‘द रॉक’ म्हणून ओळखले जायचे. तो WWE मधील एक सुपरस्टार रेसलर होता. अन् याच लोकप्रियतेमुळं त्याला चित्रपटात काम करण्यासाठी संधी मिळाली. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे केवळ नैराश्य घालवण्यासाठी त्यानं WWE खेळण्यास सुरुवात केली होती. OMG! नागपुरच्या लोपमुद्रा राऊतचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज; PHOTOS ची तुफान चर्चा लहानपणापासून ड्वेनला फुटबॉलची प्रचंड आवड आहे. एक दिवस तो आंतरराष्ट्रीय स्थरावर फुटबॉल खेळेल अशी स्वप्न तो रंगवत होता. यासाठी त्यानं फुटबॉलचं शास्त्रशुद्ध शिक्षण देखील घेत होतं. लक्षवेधी बाब म्हणजे हायस्कूलमध्ये असताना कॅनडाच्या संघातून खेळण्याची संधी देखील त्याला मिळाली होती. परंतु काही सामन्यांनंतर त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं. या घटनेचा ड्वेनवर जबरदस्त मानसिक आघात झाला होता. तो नैराश्येत गेला होता. एकदा तर त्यानं झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. पुढे एका मित्राच्या सांगण्यावरुन त्यानं आपला राग व्यक्त करण्यासाठी रेसलिंग खेळण्यास सुरुवात केली. पुढे त्याचा रागच त्याला WWE पर्यंत घेऊन गेला. या शोमध्ये त्याला द रॉक म्हणून ओळखले जाऊ लागले. आज द रॉक म्हटले की WWEचे वातावर उत्साहित होते परंतु या उत्साहामागे ड्वेनच्या अर्धवट राहिलेल्या इच्छा होत्या. खऱ्या आयुष्यात अर्धवट राहिलेल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी रॉकने चित्रपटांचा रस्ता स्विकारला. आणि आज तो हॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या