TV वरील हनुमान Lockdown मुळे बेरोजगार; पैशांसाठी विकावी लागली आवडती बाईक

TV वरील हनुमान Lockdown मुळे बेरोजगार; पैशांसाठी विकावी लागली आवडती बाईक

एका टिव्ही सिरियल मध्ये हनुमानाची भूमिका करणारा कलाकार निर्भय वाधवा (Nirbhay Wadhwa) मागील दिड वर्षांपासून बेरोजगार आहे.

  • Share this:

मुंबई, 9 जून- कोरोनाचा (Corona) फटका देशातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. लॉकडाऊन (Lockdown) आणि कडक निर्बंधांमुळे उद्योग-व्यवसायावर परिणाम झाला असून अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. याला सिनेसृष्टी (Bollywood) आणि टिव्ही इंडस्ट्री (TV Industry) देखील अपवाद नाहीत. लॉकडाऊनमुळे टिव्ही इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होत आहे. टिव्ही सिरीयल्सचे शुटींग ठप्प आहेत. या स्थितीमुळे अनेक कलाकार रस्त्यावर आले आहेत. जवळची पुंजी संपल्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञांना आर्थिक अडचणीचा (Economic Crisis) सामना करावा लागत आहे. यातच काही कलाकार, तंत्रज्ञ पर्यायी रोजगारदेखील शोधत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nirbhay Wadhwa (@nirbhay.wadhwa)

अशाच एका टिव्ही सिरियल मध्ये हनुमानाची भूमिका करणारा कलाकार निर्भय वाधवा (Nirbhay Wadhwa) मागील दिड वर्षांपासून बेरोजगार आहे. लॉकडाऊनमुळे कामं मिळत नसल्याने निर्भय आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्याच्यावर आपली आवडती बाईक (Bike) विकण्याची वेळ आली आहे.

(हे वाचा:'आता माझी सटकली'; सनी लियोनीचा हा जबरदस्त VIDEO होतोय VIRAL  )

टिव्हीवरील हनुमान निर्भय वाधवा याने आपल्या कठीण दिवसांविषयी मनमोकळी चर्चा केली. त्याने ई टाइम्सशी बोलताना सांगितले, की जवळपास दिड वर्ष कामाअभावी घरातच बसून राहवे लागल्याने परिस्थिती नाजूक बनली. या लॉकडाऊनच्या काळात माझी सर्व बचत संपली. काहीच काम मिळाले नाही. लाईव्ह शो (Live Show) देखील बंद होते. काही पेमेंट बाकी होते, ते देखील मिळाले नाही. मला अडव्हेन्चर्सची आवड आहे. त्यामुळे माझ्याकडे सुपर बाईक आहे. मात्र या परिस्थितीत मला ती विकावी लागली. ही बाईक जयपूरमधील माझ्या गावी होती. खर्च भागवण्यासाठी ही बाईक विकण्याचा निर्णय मला घ्यावा लागला. माझ्यासाठी ही बाईक विकणं हे सोपं नव्हतं. कारण ती खूप महागडी बाईक होती, असं निर्भय वाधवा याने सांगितलं.

(हे वाचा:आमिरचा मुलगा बॉलिवूडमध्ये यायला सज्ज; Unlock नंतर 'महाराजा'चं शूट सुरु )

पुढे बोलताना निर्भय म्हणाला की ही बाईक मी 22 लाखांना खरेदी केली होती. त्यामुळे विक्रीसाठी खरेदीदार शोधणं अवघड होतं. शेवटी कंपनीलाच ही बाईक मी साडेनऊ लाख रुपयांना विकली. या बाईकसोबत निर्भयच्या अनेक आठवणी आहेत. निर्भय सध्या विघ्नहर्ता गणेश या टिव्ही मालिकेत हनुमानाची भूमिका करत आहे.सध्या प्रत्येकजण कठीण परिस्थितीतून जात आहे. परंतु मी आशा सोडलेली नाही. माझा कर्मावर विश्वास आहे. लवकरच जनजीवन सामान्य होईल. मी माझं काम सुरु ठेवलं आहे आणि लवकरच अजून एक बाईक खरेदी करता यावी अशी अर्थिक स्थिती माझी असेल. जे सर्वश्रेष्ठ आहे, त्याचीच मला आशा आहे, असं निर्भय वाधवा याने बोलताना सांगितले.

Published by: Aiman Desai
First published: June 9, 2021, 9:21 PM IST

ताज्या बातम्या