इंटीमेट सीन शूट करताना कशी होते अवस्था, बॉलिवूड अभिनेत्यानं शेअर केला अनुभव

इंटीमेट सीन शूट करताना कशी होते अवस्था, बॉलिवूड अभिनेत्यानं शेअर केला अनुभव

आजकाल कोणत्याही सिनेमात इंटीमेट सीन्स असणं ही खूपच सामान्य बाब झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : आजकाल कोणत्याही सिनेमात इंटीमेट सीन्स असणं ही खूपच सामान्य बाब झाली आहे. सिनेमाच्या स्क्रिप्ट प्रमाणे जवळपास सर्वच कलाकारांना इंटीमेट सीन्स द्यावे लागले आहेत. पण अनेक कलाकरांनी याचीही कबुली दिली आहे की या सीन्सचं शूटिंग हीच संपूर्ण सिनेमातील सर्वात कठीण गोष्ट असते. नुकतंच साऊथ सुपरस्टार आणि बॉलिवूड अभिनेता दुलकर सलमाननं एका मुलाखतीत इंटीमेट सीन्स शूट करताना त्याला त्याची अवस्था कशी खराब होते आणि तो चलाखीनं हे सर्व कॅमेऱ्यापासून कसं लपवतो याचा अनुभव शेअर केला.

दुलकर सलमाननं नुकतीच नेहा धुपियाचा चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यानं स्वतःबद्दल अनेक मजेदार गोष्टी शेअर केल्या. त्यानं सांगितलं की तो सिनेमातील इंटीमेट सीन शूट करताना तो खूप नर्व्हस होतो. त्याचे हात-पाय थरथरतात. तो म्हणाला, ‘मी नेहमी याचा विचार करतो की माझी कोस्टार काय विचार करत असेल की, मी यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे? नंतर मला वाटतं की मी न्यूड आहे आणि तिला हे समजतंय की मी काय आहे.’

अभिनेत्री उर्वशी रौतेला करतेय क्रिकेटर वृषभ पंतला डेट?

 

View this post on Instagram

 

"Blue skies, smilin' at me Nothin' but blues skies do I see Bluebirds singing a song Nothin' but bluebirds all day long" "Blue days, all of them gone Nothin' but blue skies from now on" #gottaquotefrank #myhappyplace #calmerofthenerves #sootherofthesoul #bluegotmelike #dq #beanoldsoul #thanksto #thatbeardowithalenso #fortakingmetomyfavouriteplace #myboyshootingme Photography & Styling : @shanishaki Retouch : Jemini Ghosh Photography Assistants : Sreeraj, Ajith Varghese, Justin & Girilal Wardrobe : @shanishaki & @dqsalmaan HMU: @bijubhaskarsami & @av_ratheeshcinema

A post shared by Dulquer Salmaan (@dqsalmaan) on

दुलकर पुढे म्हणाला, अशावेळी माझे हात-पाय थरथरतात. मग मी माझे हात नेहमीच माझ्या को-स्टारच्या केसांमागे लपवतो. रियल लाइफमध्ये प्रेम व्यक्त करणं खूप सोपं असतं. कारण समोरच्या व्यक्तीला आपण त्याप्रमाणे ओळखत असतो. पण जेव्हा हिच गोष्ट कॅमेऱ्यासमोर करावी लागते. त्यावेळी ते खूप कठीण होऊन जातं. यावेळी दुलकर सलमाननं सोनम कपूरसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे. तो म्हणाला, ‘या सर्वात सोनम खूपच स्वीट आहे.’

बॉक्सऑफिसवर 2020मध्ये होणार मोठी टक्कर, या कलाकारांमध्ये रंगणार तगडी स्पर्धा

दुलकर सलमान आणि सोनम कपूर यांनी द झोया फॅक्टर या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमात त्यानं एका क्रिकेटरची भूमिका साकारली होती. तर सोनम कपूरनं या सिनेमात झोया नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती जी टीमसाठी खूप लकी आहे असा सर्वांचा समज असतो. या सिनेमात या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री दिसली होती मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करु शकला नव्हता.

HBD Thalaiva: कधी बस कंडक्टरची नोकरी करणारा अभिनेता आज आहे 'साउथचा देव'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Dec 12, 2019 01:30 PM IST

ताज्या बातम्या